बीड : गेवराई शहराजवळ तिहेरी अपघात | पुढारी

बीड : गेवराई शहराजवळ तिहेरी अपघात

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : गेवराई शहरा जवळील माहामार्गाच्या बाह्यवळनावर तिहेरी अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबतची आधिकची माहिती अशी की, गेवराई शहरातील बीड रोडवरील बाह्यवळणावरील रस्त्यावर दि. १६ रोजी कार, स्कुलबस, व दुचाकीचा तिहेरी अपघात झाला. यामध्ये दोघे जखमी झाले, तर दुचाकी चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. येथील छत्रपती संभाजी महाराज चौकासमोर सोमवारी (दि.१६) रोजी दुपारी २:30 च्या सुमारास आपघात झाला

बीड कडून एक कार (क्र. MH 23-AD-1620) गेवराईच्या दिशेने येत होती त्यावेळी पाठी मागुन येणाऱ्या स्कुल बसने (MH12 EQ1671) कारला धडक दिली. यामध्ये सुदैवाने कार चालक बचावला असुन, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. परंतू पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने (क्र. MH-04-DP-7358) स्कुल बसला पाठी मागुन जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार आणि सोबतचा एकजण असे दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हालवले आहे. सदर दोघे जखमी गढी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेचा पंचनामा पोलीस केला असुन पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा

Back to top button