नगर : चार वर्षांची बालिका करतेय नर्मदा परिक्रमा | पुढारी

नगर : चार वर्षांची बालिका करतेय नर्मदा परिक्रमा

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  चार वर्षाची मुलगी रासेश्वरी रमेश जाधव ही मागील तीन महिन्यांपासून पायी नर्मदा परिक्रमा करीत आहे. एवढ्या लहान वयात अद्याप कोणीही नर्मदा परिक्रमा केलेली नाही. तिच्या या धाडसी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्यासोबत वडील रमेश जाधव महाराज व आई हरिभक्त परायण अर्चनाताई गिरी-जाधव हे देखील सहभागी झाले आहेत. ऑक्टोबरपासून यात्रा ओंमकारेश्वर येथून सुरू झाली आहे. साडेतीन ते पावणेचार हजार किलोमीटरची ही परिक्रमा आहे.

रासेश्वरी रोज 25 ते 30 किलोमीटर चालते. रासेश्वरीच्या स्वागतासाठी दक्षिण व उत्तर तटावर हजारो भाविकांची गर्दी होत आहे. शिवरात्रीनंतर रासेश्वरी महाराष्ट्रात साडेतीन हजार किलोमीटरची परिक्रमा करून येणार आहे. तिच्या आई-वडिलांसह स्वरमाला शिंदे, राधेश्याम परिवारातील गोरडे परिवार आहेत. त्यांचे धांडेवाडीचे सरपंच काकासाहेब धांडे धनु धांडे महाराज, विशाल धांडे, राहुल सुरवसे, दादासाहेब सुरवसे, आदेश जमदाडे यांनी अभिनंदन केले आहे.

 

Back to top button