रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’चा बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ, १० दिवसांत ३३ कोटींची कमाई, ‘लयभारी’ला टाकणार मागे | पुढारी

रितेश-जेनेलियाच्या 'वेड'चा बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ, १० दिवसांत ३३ कोटींची कमाई, 'लयभारी'ला टाकणार मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख याच्या ‘वेड’ ह्या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन १० दिवस झाले आहेत. दुसऱ्या आठवड्यातदेखील हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी थिअटरबाहेर पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता रितेशच्या याआधीच्या ‘लयभारी’ चित्रपटाला मागं टाकलं असून त्याची वाटचाल ब्लॉकबस्टरकडे होत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १० कोटी आणि दुसऱ्या आठवड्यात १२.७५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये २७.५० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी २.५२ कोटी, शनिवारी ४.५३ कोटी आणि रविवारी ५.७० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने एकूण ३३.४२ कोटींची कमाई केली आहे, अशी माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत दिली आहे.

जेनेलियाने या चित्रपटातून मराठीमध्ये पहिल्यांदा पदार्पण केले आहे. तर रितेशचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटातून कपलने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. वेड चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ३० डिसेंबरला हा चित्रपट रिलीज झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी चित्रपटाने २ कोटी २५ लाख, दुसऱ्या दिवशी ३ कोटी २५ लाख, तिसऱ्या दिवशी ४ कोटी ५० लाख, चौथ्य़ा दिवशी ३ कोटी, सातव्या दिवशी २ कोटी ४५ लाख रुपयांचा भरघोस गल्ला जमवला आहे. तर या चित्रपटाने ९ व्या दिवशी दुप्पट कमाई करत तब्बल ५ कोटींचा गल्ला जमवला.

हे आकडे पाहता ‘वेड’ने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ आणि रितेशच्या स्वत:च्या ‘लयभारी’ या दोन्ही चित्रपटाला मागे टाकलं आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सर्कसने बॉक्स ऑफिसवर ३६ कोटी ८२ लाख रूपयांची कमाई केली होती. तर लयभारीने ४० कोटींची कमाई केली होती. आता ‘वेड’ने ४० कोटींच्या दिशेने वाटचाल केली आहे. याशिवाय तो मराठीतील ‘सैराट’ (८५ कोटी) च्या रेकाॅर्ड ब्रेक कमाईकडे वाटचाल करत आहे.

हेही वाचा : 

Back to top button