Health Tips : तुम्हालाही हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास होतोय ? तर या टिप्स तुमच्यासाठी | पुढारी

Health Tips : तुम्हालाही हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास होतोय ? तर या टिप्स तुमच्यासाठी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Health Tips : थंडी या ऋतूबाबत पुस्तकात कितीही रोमॅंटिक कल्पना असल्या तरी बऱ्याचदा प्रत्यक्षात चित्र वेगळं असू शकतं. याला कारण म्हणजे थंडीत बळावणारे आजार. अनेकांना थंडी सुरू झाली की अंगदुखीचा त्रास होऊ लागतो. विशेषत: सकाळी उठल्यावर हा त्रास बळावतो. तुम्हालाही हा त्रास होत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी…(Health Tips)

Health Tips : ही आहे हिवाळ्यात अंगदुखीची कारणं :

स्नायूमधील वेदना : हिवाळ्यात अनेकदा हालचालींवर निर्बंध येतात. त्यामुळे स्नायू कडक होण्याची शक्यता बळावते. त्यामुळेच रोज प्रवास करणाऱ्या व्यक्तींनाही अंगदुखीचा त्रास होऊ लागतो. सतत थंड हवेच्या संपर्कात आल्यास स्नायूचा कठिणपणा वाढून त्रास होण्याची शक्यता कैकपटीने वाढते. त्यामुळे प्रवास करताना शरीराचा कोणताही भाग थेट थंड हवेच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. अनेकजण स्नायूदुखी सुरू झाली की व्यायाम थांबवतात. पण हे चुकीचं आहे. त्यामुळे हिवाळ्यात अंगदुखी होत असली तरी व्यायामाच्या रुटीनमध्ये खंड पडू देऊ नका.

Health Tips : विटामीन डीची कमतरता : हिवाळ्यात दिवस लहान असतो. यासोबतच सूर्यप्रकाशही म्हणावा इतका प्रखर नसतो. त्यामुळेच शरीराला म्हणावा त्या प्रमाणात विटामीन डी मिळत नाही. त्यामुळे हाडांची दुखणी वर येतात. शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्परस मिळत नसल्याने अंगदुखी सुरु होते. स्ट्रेचिंग करणं यावरचं उत्तम उपाय आहे. सकाळी शक्य होत असल्यास कोवळ्या सूर्यप्रकाशात स्ट्रेचिंग केल्याने शरीराला फायदा होऊ शकतो.

Health Tips : झोप : खरं तर हिवाळ्यात झोप येते. पण अनेकजण या दिवासतही अपुरी झोप घेताना दिसतात. त्यामुळेच स्नायूमधील ताण वाढतो. शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा विश्रांतीमधून मिळण्याची शक्यता कमी होते. त्यामुळेच या दिवसात पुरेशी झोप न घेतल्यास अंगदुखी वाढण्याची शक्यता असते.

Life StyleWinter Jacket : यंदाचा हिवाळा स्टायलिश बनवण्यासाठी जाणून घ्या लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स

Life StyleWinter Jacket : यंदाचा हिवाळा स्टायलिश बनवण्यासाठी जाणून घ्या लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स

Back to top button