Life StyleWinter Jacket : यंदाचा हिवाळा स्टायलिश बनवण्यासाठी जाणून घ्या लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स

Life StyleWinter Jacket : यंदाचा हिवाळा स्टायलिश बनवण्यासाठी जाणून घ्या लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Life StyleWinter Jacket : दिवाळी पाडवा संपला की हिवाळ्याची सुरुवात होते. गुलाबी थंडीत आपले सौंदर्य खुलवून रोमँटिक मूड बनवण्यासाठी ऑनलाइन ऑफलाइन मार्केटमध्ये अनेक स्टाईलिश जॅकेट्स आले आहेत. पारंपारिक वूलन स्वेटर्स सोबतच फरचे जॅकेट्स, सॉलिड पॅडेड, विथ पॉलिस्टर लायनिंगचे जॅकेट्स, डेनिम जॅकेट्स असे एक ना अनेक प्रकारचे जॅकेट्स आणि जर्किन उपलब्ध आहेत. पाहा त्यापैकी कोणत्या जॅकेट्सने तुमचे सौंदर्य खुलेल आणि तुम्ही अदिक स्टाईलिश दिसाल…

Life StyleWinter Jacket : डेनिम जीन्स जॅकेट्स : तसे तर हे जॅकेट्स वर्षभर चालतात. मात्र, हिवाळ्यासाठी अनेक रंगांचे शॉर्ट मीडियम आणि लाँग जॅकेट्स खास आले आहेत. मीशो, मिंत्रा, फ्लिपकार्टवर हे 250 च्या पुढील दरात सुरू आहेत. काही वेळा हे जॅकेट्स स्टाईलिश बनवण्यासाठी कॉलरला फरचा टचअप देण्यात आला आहे.

Life StyleWinter Jacket : नॉयलॉन पॉलिस्टरचे न्यू डिझाईन जॅकेट्स : नॉयलॉन पालिस्टरचे लाइनिंग पॉकेट झिप्सचे बॉम्बर जॅकेट्सचा देखिल ट्रेंड गेल्या दोन तीन वर्षांपासून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यंदा यामध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत आकर्षक रंगात बनवण्यात आलेले हे जॅकेट्स एकदम युजर फ्रेंडली डिजाइन केले आहेत.

Life StyleWinter Jacket : वेल्वेट जॅकेट्स : यंदा महिलांसाठी नवीन ट्रेंडमध्ये स्टाईलिश वेल्वेटचे जॅकेट्स आले आहेत. हे जॅकेट ब्ल्यू आणि पिंक या एकदम रिच कलरमध्ये उपलब्ध आहेत. ते स्वेटशर्ट्स प्रमाणे देकिल तुम्हाला वापरता येतात. जीन्सवर झटपट घालण्यासाठी हे खूपच यूजर फ्रेंडली आहेत. हे 400 ते 900 -1000 च्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत.

लाँग जॅकेट्स : बाजारात लाँग जॅकेट्स आणि लाँग स्वेटर्सची सध्या खूप चलती आहे. खासकरून हे महिलांसाठी डिजाइन केले आहेत. जीन्स वर क्रॉप टॉप घालून त्यावर लाँग जॅकेट विथ स्टाइलिश गॉगल हे खूपच सुंदर कॉम्बिनेशन मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये आहेत. तसेच साडीवर घालण्यासठी लाँग स्वेटर खूपच उठून दिसतात.

Life StyleWinter Jacket : स्वेटर सेट्स विथ क्रॉप टॉप : तर यंदाचा मार्केटमधील सर्वात नवीन ट्रेंड म्हणजे स्वेटर सेट विथ सिंगल स्ट्रिप क्रॉप टॉप एकाच रंगात. अशा प्रकारचे स्वेटर सेट्स विथ क्रॉप टॉप जीन्स-मिनी स्कर्टवर शोभून दिसतात.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news