Fair Leaf Monkey : दवबिंदू पिणारी माकडं! | पुढारी

Fair Leaf Monkey : दवबिंदू पिणारी माकडं!

नवी दिल्ली : जगभरात माकडांच्याही अनेक प्रजाती आहेत आणि त्यामध्ये अत्यंत वेगळी वैशिष्ट्ये असणारीही माकडे आहेत. या वेगळ्या प्रजातींमध्ये ‘फेयर्स लीफ मंकी’ (Fair Leaf Monkey) दवबिंदू पिणारी माकडं! )नावाच्या माकडांचा समावेश होतो. त्यांना ‘चष्मा माकडं’ असेही म्हटले जाते. याचे कारण म्हणजे त्यांच्या डोळ्यांभोवती चष्म्यासारखी रचना असते. त्रिपुराच्या सिपाहीजला वन्यजीव अभयारण्यात ही माकडं मोठ्या संख्येने असतात. शिवाय आसाम, मिझोराम, बांगलादेश, चीन, म्यानमारमध्येही ही माकडं आढळतात. ही माकडं दवबिंदू तसेच पानांवरून ओघळणारे पाणी पिऊन आपली तहान भागवतात.

ही माकडं (Fair Leaf Monkey) अतिशय चपळ आणि तितकीच लाजाळू असतात. घनदाट अरण्यातच त्यांचा निवास असतो. इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या माहितीनुसार या लीफ माकडांचा समावेश लुप्तप्राय प्राण्यांमध्ये होतो. ही माकडं समूहाने राहतात आणि ती अतिशय परोपकारी असतात. आपले अन्न ते एकमेकांना वाटून खातात हे विशेष. या लीफ मंकीच्या डोळ्यांभोवती सफेद रंगाची वर्तुळाकार रचना असते.

त्यामुळे त्यांनी चष्मा परिधान केला आहे की काय असे एखाद्याला वाटू शकते! झाडावर अतिशय उंचीवर ते राहतात व क्वचितच जमिनीवर येतात. ब्रिटिश भारतीय सैन्यातील एक अधिकारी सर आर्थर पूर्वस फेयर यांनी त्यांचा शोध लावला होता. त्यांचे नाव या माकडांच्या (Fair Leaf Monkey) प्रजातीला देण्यात आले आहे. ही माकडे दवबिंदू पितात तसेच पावसाचे पाणी झाडाच्या पानांवर पडले की ही पाने हलवून त्यावरील पाणी पितात. फळे, पाने व फुले हाच त्यांचा मुख्य आहार असतो.

हेही वाचा : 

Back to top button