Indian Air Force: ‘अवनी चुतर्वेदी’ ठरणार विदेशी हवाई युद्धाभ्यासात सहभागी होणारी पहिली महिला फायटर पायलट | पुढारी

Indian Air Force: 'अवनी चुतर्वेदी' ठरणार विदेशी हवाई युद्धाभ्यासात सहभागी होणारी पहिली महिला फायटर पायलट

पुढारी ऑनलाईन: भारतीय वायुदलाची पहिली महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी जपानसोबतच्या हवाई सरावात भाग घेणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे विदेशी हवाई युद्धसरावात सहभागी होणा-या ‘त्या’ पहिल्याच महिला फायटर पायलट ठरणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जपान आणि भारत दोन्ही देशांचा ‘वीर गार्डियन 2023’ हा संयुक्त हवाई सराव 12 ते 26 जानेवारी दरम्यान चालणार आहे. हा युद्धाभ्यास जपानमधील ओमिटामा येथील हायकुरी आणि सयामा या हवाई तळांवर होणार आहे.

स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी सुखोई 30MKI ची पायलट आहे. तिने 2018 मध्ये मिग-21 एकटीने उडवले आहे. अवनी तिच्या बॅचमेट्स भावना कांत आणि मोहना सिंग यांच्यासोबत जुलै 2016 मध्ये फ्लाइंग ऑफिसर बनली. अवनी चतुर्वेदी या भारतातील पहिल्या तीन महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. भारतीय वायुसेनेची महिला फायटर पायलट भारताबाहेरील युद्ध अभ्यासाचा पहिल्यांदाच भाग असणार आहे.

भारतीय हवाई दलाने एका निवेदनात म्हटले की, भारत जपानमध्ये होणाऱ्या या युद्धाभ्यासात चार Su-30 MKI विमाने, दोन C-17 विमाने आणि एक IL-78 विमान भारताकडून या सरावात सहभागी होतील. या सरावात JASDF ची चार F-2 आणि चार F-15 विमाने देखील सहभागी होणार आहेत. “देशांमधील हवाई संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी, भारत आणि जपान संयुक्त हवाई सराव ‘वीर गार्डियन-2023’ आयोजित करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button