चंद्रपूर : वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा घंटानाद | पुढारी

चंद्रपूर : वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा घंटानाद

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून वाघ, बिबट्याचे मानवावरील हल्ले वाढले आहेत. आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. परंतु, वनविभागाकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही, असा आरोप करीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलनाचे आयोजन केले होते. परंतु, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला.

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. व्यक्ती वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची मदत वनविभागातर्फे देण्यात येते. त्याच प्रमाणे कायमस्वरूपी व्यक्तीला अपंगत्व आल्यास 20 लाख रुपये मदत देण्याची मागणी या वेळी खासदार बाळू धानोरकर यांनी केली.

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वातील आंदोलनात गडचिरोली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. किरसान, मिथून ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, सतीश विधाते, मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, अतुल मल्लेलवार, दीपक ठाकरे, अब्दूल पंजवानी, नेताजी गावतुरे, सावली पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार, सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खुशाल लोडे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button