Delhi MCD Mayor Elections : दिल्ली महापालिकेत राडा, भाजप-आप नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की, एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या | पुढारी

Delhi MCD Mayor Elections : दिल्ली महापालिकेत राडा, भाजप-आप नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की, एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली महापालिका (Delhi MCD Mayor Elections) निवडणुकीत भाजपती सत्ता उलथवून लावत आपने सत्ता काबीज केली आहे. आज (दि. ६) महापौर उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यासाठी सभा बोलावली होती. दरम्यान, मतदानापूर्वी नगरसेवकांना शपथ घ्यावी लागते. मात्र, त्यापूर्वीच आपच्या नगरसेवकांनी चुकीच्या पद्धतीने शपथ घेतली जात असल्याचा आरोप करत सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भाजप नगरसेवकांची आणि आपच्या नगरसेवकांशी बाचाबाची होऊन जोरदार हाणामारी झाली.

 (Delhi MCD Mayor Elections) आम आदमी पक्षाने महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे नगरसेवक सत्य शर्मा यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास आक्षेप घेतला. दुसरीकडे, काँग्रेसने या निवडणुकीत मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृहात आप आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार गदारोळ झाला. हाणामारी आणि हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचले. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी धक्काबुक्की करत एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या.

दरम्यान, भाजप खासदार मनोज तिवारी यांनी ट्विट करत आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. आपच्या नगरसेवकांनी गुंडगिरी सुरू केली आहे. धक्काबुक्की, कायदा न पाळणे, आप पक्षाकडून सातत्याने होत आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अधिकारी आणि नेत्यांना आपल्या घरी बोलावून धमक्या दिल्या आहेत, असा आरोपही तिवारी यांनी केला.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, एमसीडीमधील गैरकारभार लपवण्यासाठी भाजपकडून असला प्रकार सुरू आहे. पीठासीन अधिकाऱ्याची बेकायदेशीर नियुक्ती, नामनिर्देशित नगरसेवकांची बेकायदेशीर नियुक्ती, लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांना शपथ दिली जात नाही. जनतेच्या निर्णयाचा आदर करता येत नसेल, तर निवडणूक कशासाठी घेतली? असा सवाल केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button