Pele Funeral : महान फुटबॉलपटू पेले यांच्यावर अंत्यसंस्कार; आईच्या घरासमोरून निघाली अंत्ययात्रा | पुढारी

Pele Funeral : महान फुटबॉलपटू पेले यांच्यावर अंत्यसंस्कार; आईच्या घरासमोरून निघाली अंत्ययात्रा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्यावर आज (दि.३) सॅंटोस शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले. सॅंटोस एफसी फुटबॉल क्लबच्या स्टेडियममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साओ पाउलो येथील विला बेल्मिरो स्टेडियमवर पेले यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती. पेले यांची अंत्ययात्रा त्यांच्या १०० वर्षांच्या आईंच्या घरासमोरून काढण्यात आली. पेले यांच्या अंत्ययात्रेला २ लाखहून अधिक लोक उपस्थित होते. (Pele Funeral)

एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो म्हणजेच पेले यांचे गुरुवारी (दि. डिसेंबर २९) कर्करोगाने वयाच्या ८२ व्या निधन झाले होते. पेलेंनी ब्राझीलला तीन विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. पेले यांचे सॅंटोस शहरात येथे घर आहे. त्या घरात त्यांनी जवळपास आपले सर्व आयुष्य व्यतीत केले होते. त्यांनी आपली शेवटची वर्षे गुरुजा या शहरात घालवली. (Pele Funeral)

पेले यांनी १९५६ मध्ये सॅंटोस क्लबशी करार केला होता. तेव्हा त्यांचे वय १५ वर्षे होते. पेलेंनी सॅंटोससाठी पहिल्याच सामन्यात गोल केला. तेव्हापासून ते संघाचा महत्त्वाचा सदस्य बनले होते. ते १९७४ पर्यंत क्लबकडून खेळत होते. १९७४ नंतर पेलेंनी १९७५ ते १९७७ पर्यंत न्यूयॉर्क कॉसमॉस क्लबकडूनही खेळले होते.

इटलीचा जुव्हेंटस, स्पेनचा बार्सिलोना, रिअल माद्रिद आणि इंग्लंडच्या मँचेस्टर युनायटेडन अशा दिग्गज क्लबनी पेलेंना करारबद्ध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मोठ्या ऑफर असूनही पेलेंनी सँटोस संघ कधी सोडला नव्हता.

हेही वाचा;

Back to top button