Indian Coach : द्रविड गुरुजींना मिळणार नारळ; बीसीसीआयकडून ‘या’ नावावर चर्चा

Indian Coach : द्रविड गुरुजींना मिळणार नारळ; बीसीसीआयकडून ‘या’ नावावर चर्चा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : यावर्षी भारत एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. यासंदर्भात नुकतीच बीसीसीआयची आढावा बैठक (दि.०१) घेतली. या बैठकीमध्ये नवे मुख्य प्रशिक्षक कोण असेल याबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भारतीय संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Indian Coach)

सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ एकदिवसीय विश्वचषकापर्यंतच आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता देखील कमी आहे. सध्याच्या चर्चांनुसार बीसीसीआय राहुल द्रविड यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. (Indian Coach)

व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत  (Indian Coach)

राहुल द्रविड यांच्या जागी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण आघाडीवर आहेत. या पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. याशिवाय टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहेत. आशिया चषक २०२२ दरम्यान राहुल द्रविड यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. दरम्यान यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती.

व्हीव्हीएस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख

व्हीव्हीएस लक्ष्मण हे सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत. तर राहुल द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख होते. यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मण हे २०२२ साली अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून वेस्ट इंडिजला गेले होते. व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय अंडर-१९ संघाने चांगली खेळी करून विजेतेपद पटकावले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news