पुणे : नववर्षाच्या सुरुवातीलाच चोरट्यांचा कहर ; 2 फ्लॅट फोडून 64 लाखांचा ऐवज चोरला | पुढारी

पुणे : नववर्षाच्या सुरुवातीलाच चोरट्यांचा कहर ; 2 फ्लॅट फोडून 64 लाखांचा ऐवज चोरला

पुणे :  पुढारी वृत्तसेवा : सिंहगड आणि कोथरूड भागात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून तब्बल 64 लाखांवर डल्ला मारला आहे. धायरीत चोरट्यांनी पानशेतच्या उपसंरपचाचे घरफोडून 23 लाखांचा ऐवज चोरला आहे. तर, खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्या व्यक्तीच्या घरातून 41 लाखांचा ऐवज चोरला आहे.

उपसरपंचाचेच घर फोडले !

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आशिष पासलकर (वय 33, रा. धायरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार भरदुपारी घडला आहे. तक्रारदार हे मुळचे पानशेतमधील असून, ते पानशेतचे उपसंरपच आहेत. त्यांचे हॉटेल देखील आहे. राहण्यास धायरीमधील पार्थ संकुल येथे आहेत. हॉटेलवर गर्दी झाल्यानंतर ते त्याच ठिकाणी थांबतात. दरम्यान, थर्टीफस्टच्यानिमित्त ते हॉटेलात गेले होते. त्यावेळी गर्दी असल्याने ते त्याच ठिकाणी थांबले होते. यादरम्यान, चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तसेच, घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 23 लाख 53 हजारांचा ऐवज चोरून नेला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार समोर आला. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, तक्रारदार यांच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यात चोरटे कैद झाले आहेत. मास्क परिधान केलेले तीन चोरटे दुचाकीवरून आल्याचे यात दिसत आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही.

दुबईला गेल्यानंतर फोडला फ्लॅट :

दुसरी घटना कोथरूडमधील पौड रोडवर घडली असून, चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून तब्बल 41 लाख 16 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी 79 वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार पौड रस्त्यावरील रामबाग कॉलनीत एका सोसायटीत राहण्यास आहेत. ते एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांची एक मुलगी दुबईत असते. तिला भेटण्यासाठी ते 13 डिसेंबर रोजी गेले होते. ते परत 27 डिसेंबर रोजी आले. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील 32 लाखांचे दागिने, हिर्‍याचे 7 लाखांचे दागिने व रोकड असा एकूण 41 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दोन्हीही प्रकरणात पोलिस तांत्रीक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढत आहेत.

Back to top button