Al-Qaida : भारत व भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घाला; अल-कायदाचे मुस्लिम राष्ट्रांना आवाहन | पुढारी

Al-Qaida : भारत व भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घाला; अल-कायदाचे मुस्लिम राष्ट्रांना आवाहन

पुढारी ऑनलाइन डेस्क : Al-Qaida : अल-कायदाने मुस्लिम देशांनी भारत आणि भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन केले आहे. तसेच अरब देशांमध्ये काम करणा-या हिंदूंना बाहेर काढण्याचे देखील आवाहन केले आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अल कायदाने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष्य केले आहे.

Al-Qaida : अल-कायदा मीडिया, अस-साहब या दहशतवादी गटाने वन उम्मा या नियतकालिक मासिकाचा पाचवा अंक प्रकाशित केला. नियतकालिकातील या लेखातून अल-कायदाने मुस्लिम आणि इस्लामिक राष्ट्रांना भारताविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. इंडिया टुडेने या लेखातील मजकूर प्रकाशित केला आहे.

इंडिया टुडे ने दिलेल्या माहितीनुसार, अल-कायद्याच्या लेखात असे म्हटले आहे की, “मुस्लिम जगतातील मौनामुळे भारताच्या हिंदू सरकारला यावेळी मर्यादा ओलांडून पैगंबराचा अपमान करण्यास प्रोत्साहित केले गेले.

Al-Qaida : अल-कायदाने प्रकाशित केलेल्या लेखात पुढे असे म्हटले आहे की, “आम्ही आमच्या उदात्त समाजाला (our noble Ummah) या हिंदू सरकारच्या विरोधात एकत्र येण्यासाठी आणि भारतातील त्यांच्या बंधू-भगिनींना मदत करण्यासाठी आमंत्रित करतो जेणेकरुन अल्लाहचे शत्रू आमच्या पैगंबर विरुद्ध अशा प्रकारच्या घृणास्पद अपराधाची पुनरावृत्ती करू नयेत.

Al-Qaida : “आम्ही सर्व मुस्लिमांना, विशेषत: व्यावसायिकांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी, हिंदू कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यासाठी आणि त्यांना मुस्लिम देशांमधून बाहेर काढण्यासाठी आमंत्रित करतो. मोदींच्या लाखो समर्थकांना आपल्या पैगंबरांच्या द्विपकल्पात (जमिनीवर) राहू देणे हे अपमानास्पद आहे,” असे अल कायदाने म्हटले आहे.

हे ही वाचा :

Jammu and Kashmir News : सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ; सहाजण ताब्यात

Back to top button