Jammu and Kashmir News : सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

Jammu and Kashmir News
Jammu and Kashmir News
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir News) सिध्रा येथे सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यामध्ये ३ दहशतवादी ठार झाले. ही चकमक आज (बुधवार, दि.२८) झाली. अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंग म्हणाले की, गोळीबार झाला तेव्हा दहशतवादी ट्रकमध्ये होते. तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, एका दहशतवाद्याचा मृतदेह चकमकीच्या ठिकाणाहून मिळाला आहे.

एडीजीपी मुकेश सिंग म्हणाले, "आम्ही ट्रकचालकाची संशयास्पद हालचाल लक्षात येताच त्याचा पाठलाग केला. जम्मूमधील सिध्रा येथे ट्रक थांबवण्यात आला. तिथे चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. ट्रकचा शोध घेतल्यानंतर आत लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला,"

याआधी सोमवारी, रविवारी पोलीस आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त शोध मोहिमेत जम्मू-काश्मीरच्या पूंछमधील मेंढार उपविभागातून दहशतवाद्यांच्या एका ओव्हर-ग्राउंड वर्करला अटक करण्यात आली होती.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news