पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहाजणांना चतुःशृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जुलै ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील आरोपीपैकी एकाने चाकूचा धाक दाखवून तिच्यासॊबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत इतर आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकाराची माहिती अल्पवयीन मुलीने घरी दिल्यानंतर, घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार चतुर्श्रुंगी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून सहा जणांना ताब्यात घेतले आहे.