जलऊर्जा प्रकल्पांना असलेल्या धोक्याची माहिती आगाऊ मिळण्यासाठी सामंजस्य करार | पुढारी

जलऊर्जा प्रकल्पांना असलेल्या धोक्याची माहिती आगाऊ मिळण्यासाठी सामंजस्य करार

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा- डोंगराळ भागातील जलऊर्जा प्रकल्पांना असलेल्या धोक्यांची आगाऊ माहिती प्राप्त करण्यासाठी प्रणाली विकसित केली जाणार आहे. यासंदर्भात डिफेन्स रिसर्च अॅंड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात ‘डीआरडीओ’ आणि ऊर्जा मंत्रालयादरम्यान आज ( दि. २७) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

डोंगराळ आणि पहाडी भागातील हिमस्खलन, भूस्खलन, हिमनदी, हिमतलाव तसेच इतर भूगर्भीय धोक्यांची माहिती देणारे तंत्रज्ञान ‘डीआरडीओ’च्या मदतीने विकसित केले जाणार आहे. डोंगराळ भागातील जलऊर्जा प्रकल्प अथवा ऊर्जाकेंद्रांना असलेल्या धोक्यांची आगाऊ माहिती या प्रणालीमुळे मिळणे शक्य होईल, असे ऊर्जा मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

आगाऊ सूचना प्रणाली राबविण्यासंदर्भात ऊर्जा मंत्रालयाने याआधीच सीएसआयआर – एनजीआरआय, हवामान खाते, डब्ल्यूआयएचजी आणि एनआरएससी – इस्त्रो अशा संस्थांसोबत सामंजस्य करार केलेले आहेत.

हेही वाचा 

 

Back to top button