Belgaum : वकिलांच्या आंदोलनामुळे पुणे-बंगळूर महामार्ग पाऊण तास ठप्प; ५ ते ६ किलोमीटर वाहनांच्या रांगा | पुढारी

Belgaum : वकिलांच्या आंदोलनामुळे पुणे-बंगळूर महामार्ग पाऊण तास ठप्प; ५ ते ६ किलोमीटर वाहनांच्या रांगा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : वकिलाना संरक्षणाचा कायदा करण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी वकिलानी आज ( दि. २७) सुवर्णसौधच्या मुख्यद्वारासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे पुणे – बंगळूर महामार्ग सुमारे पाऊण तास ठप्प झाला होता. सुमारे पाच ते सहा किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या

बेळगाव (Belgaum) येथील सुवर्णसौधमध्ये  हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज वकिलाने दुपारी 2.30 वा. मुख्य प्रवेशद्वारासमोरच आंदोलन सुरू केले. यामुळे सुवर्णसौधमधून येणारे वाहने, त्याचबरोबर दोन्ही बाजूच्या महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. सुमारे पाच ते सहा किलोमीटर दोन्ही बाजूला वाहतूक थांबवून राहिली होती.

विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी हे कामकाज संपवुन विश्रामग्रुहाकडे जात असताना त्यांचे वाहनही या वाहतूक कोडीत अडकून पडले. त्यांना मार्ग काढून घेत असताना पोलिसांची चांगलीच तारांभबळ उडाली. सुमारे पाऊण ते तासभर ही वाहतूक ठप्प झाले होती.

हेही वाचा  :

Back to top button