शिनोलीत 91 हजार रुपयांचा गुटखा जप्त | पुढारी

शिनोलीत 91 हजार रुपयांचा गुटखा जप्त

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : शिनोली येथे अवैधरीत्या गुटखा व तंबाखू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी अब्बास दादामिया तांबोळी (वय 65, रा. शिनोली) याच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून गुटखा व तंबाखू मिळून 91 हजार 474 रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. याबाबत पोलिस जवान नीलेश तळपे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शिनोलीच्या हद्दीत शिवतेज निवाससमोर घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्याच्या कडेला अब्बास दादामिया तांबोळी हा गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट तंबाखू, सुपारी विक्रीसाठी जवळ बाळगून असल्याचे पोलिसांना समजले होते. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन छापा मारला असता तांबोळीकडे विविध प्रकारचा 91 हजार 474 रुपये किमतीचा गुटखा

मिळून आला. पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस अंमलदार जालिंदर रहाणे, नीलेश तळपे, नामदेव डेंगळे यांनी ही कारवाई केली. तपास पोलिस उपनिरीक्षक के. एच. वागज करीत आहेत.

Back to top button