पुणे : किरीट सोमय्या यांनी केले मुक्ता टिळक परिवाराचे सांत्वन | पुढारी

पुणे : किरीट सोमय्या यांनी केले मुक्ता टिळक परिवाराचे सांत्वन

पुणे पुढारी ओनलाईन : केसरी वाड्यात या निमित्ताने यावे लागेल याचे दुःख वाटत आहे. काही दिवसांपूर्वी मी मुक्ता टिळक यांना भेटण्यासाठी येथे आलो होतो. तेव्हा त्या कर्क रोगावर पण मात करतील अशी आशा मला होती. मुक्ता टिळक यांच्या परिवाराने ज्या जिद्दीने सेवा केली ती कौतुकास्पद आहे. त्यांनी जे काम सुरु केले होते, त्यांचे ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार, असल्याचे खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते आज केसरी वाड्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले होते.

संजय राऊत यांच्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, लोक त्यांच्या बोलण्यावर हसत असतात त्यांना मिमिक्री आवडत असते. महाविकास आघाडी हे माफिया सरकार होते. माझ्या विरोधात १२ खोटे एफआयआर दाखल केले. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिम्मत नाही, भ्रष्टाचाराचा एक कागदही त्यांना देता आला नाही. उद्धव ठाकरे ३२ महिने मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना एकही गुन्हा सिद्ध करता आला नाही. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे लाभार्थी आहेत का? मी कोणाच्याही विरोधातली एकही तक्रार मागे घेतली नाही, असे सोमय्या म्हणाले.

दिशा सालियन प्रकरणाबाबतही ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना प्रकरण दाबण्यात आले. मी फडणवीस यांना विनंती करणार आहे की, याबाबत जनतेला माहिती द्यावी. राहुल शेवाळे संदर्भात त्यांनी स्वतः स्पष्टता केली आहे. उद्धव ठाकरेंकडे पुरावे असतील तर त्यांनी पोलिस ठाण्यात जावं, असेही सोमय्या म्हणाले.

Back to top button