Suresh Jain : माजी आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली, तातडीने मुंबईत हलवले | पुढारी

Suresh Jain : माजी आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली, तातडीने मुंबईत हलवले

जळगाव : घरकूल घोटाळाप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना नुकताच नियमित जामीन मिळाला आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर जळगावमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, मध्यरात्री जैन त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने मुंबईला उपचाराला हलविण्यात आले आहे.

माजी मंत्री सुरेश जैन यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना काही प्रमाणात न्युमोनियाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर हवाई रुग्णवाहिकेने त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे. सुरेश जैन यांची प्रकृती स्थिर आहे. न्युमोनियाची सुरुवात झाल्याचे निदान झाले आहे. काळजी म्हणून त्यांना मुंबईत हलविण्यात आले आहे, असे डॉ. राहुल महाजन यांनी म्हटले आहे.

एअर ॲम्बुलन्सने मुंबईत हलविले

सुरेश जैन १४ डिसेंबरला जळगावात दाखल झाले होते. यानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमांसह खासगी भेटींमध्ये व्यस्त होते. यातच गुरुवारी रात्री त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. यानंतर त्यांना येथील डॉ. राहुल महाजन यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना न्युमोनियाची सुरुवात झाली असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. ‘एअर ॲम्बुलन्स’ने सुरेश जैन यांना मुंबईत हलविण्यात आले. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले. त्यांच्यावर आता ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button