पुणे : विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या गाडीला आग | पुढारी

पुणे : विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या गाडीला आग

पुणे : विद्यार्थी वाहतूक करणार्‍या गाडीला अचानक आग लागल्याची घटना वारजे परिसरात घडली. गाडीत विद्यार्थी नसल्याने गंभीर दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. गाडीत शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली. वारजे माळवाडी भागात कावेरी हॉटेल शेजारील गल्लीतून विद्यार्थी वाहतूक करणारी गाडी निघाली होती.

प्रसंगावधान राखून गाडीचा चालक खाली उतरला. गाडीत विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला. नागरिकांनी हॉटेलमधून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

Back to top button