पुणे : दरोडेखोरांची टोळी अटकेत; गोव्याला पळून जाण्याच्या होते तयारीत | पुढारी

पुणे : दरोडेखोरांची टोळी अटकेत; गोव्याला पळून जाण्याच्या होते तयारीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खंडणीसाठी दरोडा टाकून अपहरण केल्यानंतर गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला सिंहगड रोड पोलिसांनी पाठलाग करून पकडले. गाडीतील पेट्रोल संपल्यानंतर थांबले असताना, अपहृत व्यक्तीने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर धावत जात रात्रगस्तीवर नवले पुलाखाली थांबलेल्या पोलिस कर्मचार्‍याला याबाबत माहिती दिली होती.

विनोद शिवाजी जामदारे (वय 32, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक), रोहित विकास शिनगारे (वय 19, रा. जुनी म्हाडा कॉलनी, हडपसर), विशाल विठ्ठल रणदिवे (वय 22, रा. बार्शी, जि. सोलापूर), गौरव गंगाधर शिंदे (रा. ताड सौंदाने, ता. बार्शी, जि. सोलापूर), नितीन सुरेश जोगदंड (वय 35, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

यातील जमदारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे, तर बार्शी येथील आरोपींवरदेखील गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत संखे यांनी सांगितले, फिर्यादी हा कॅब चालक आहे. तो भाडे घेऊन रात्रीच्यावेळी तेथे आला होता. परत जात असताना, यातील दोघा आरोपींनी त्याला थांबवून दुसर्‍या ठिकाणी सोडण्यास सांगितले. त्या वेळी फिर्यादीने नकार दिला. त्यानंतर दोघांनी त्याला मारहाण करून आपल्या इतर चार साथीदारांना बोलावून घेतले.

सिंहगड रस्ता परिसरात मध्यरात्री चोरट्यांची टोळी थांबली असल्याची माहिती गस्तीवरील पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने नवले पूल परिसरात सापळा लावला. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली आहे. पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक निरीक्षक राहुल यादव, दीपक कादबाने, कुरळे, आण्णा केकाण, देवा चव्हाण, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर आदींनी ही कारवाई केली.

पन्नास हजारांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्या वेळी आरोपींनी त्याचे कपडे काढून त्याला गाडीत कोंबले. दरम्यान, नवले ब्रिज परिसरात आले असताना, गाडीतील पेट्रोल संपले. तिघे गाडीत थांबून दोघे पेट्रोल आणण्यासाठी पंपावर गेले होते. गाडीतील आरोपींना गुंगी लागल्याचे लक्षात येताच कॅबचालकाने तेथून पळ काढला.

त्या वेळी नवले ब्रिजखाली थांबलेले पोलिस कर्मचारी दिसले. त्याने सर्व प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी दरोडेखोरांच्या गाडीला आपली गाडी आडवी लावली. तिघांना तेथून पकडले. त्याचवेळी पेट्रोल घेऊन येणार्‍या दोघांना पोलिस दिसले. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनादेखील पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांचा एक साथीदार मात्र पसार झाला.

Back to top button