नगर ग्रामपंचायत Live : राहुरी : प्राजक्त तनपुरे यांच्या गडाला विखे गटाने पाडलं खिंडार | पुढारी

नगर ग्रामपंचायत Live : राहुरी : प्राजक्त तनपुरे यांच्या गडाला विखे गटाने पाडलं खिंडार

नगर : राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचयातीच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच मतमोजणीच्या धक्कादायक निकालाने राष्ट्रवादी व भाजप मधील रस्सीखेच दिसून आली आहे. 4 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाले असून माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गडात विखे गटाने जोरदार मुसंडी मारली आहे.

विखे- कर्डीले गट एकत्र असलेल्या भाजप ने 3 ग्रामपंचयातीवर झेंडा फडकवला तर राष्ट्रवादीला मांजरी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे मानोरी, सोनगाव व कोल्हार खुर्द या तीन ग्रामपंचयातीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने माघार घेतली होती. भाजपने विजय मिळविलेल्या तिन्ही ग्रामपंचायत लढतीत भाजप यश मिळविणार हे निश्चित होते. राष्ट्रवादीच्या ताब्यात मांजरी ग्रामपंचायतची एकहाती सत्ता आली आहे.

 

 

Back to top button