ग्रामपंचायत निवडणूक : गावकारभारी होण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, नेत्यांचे देव पाण्यात! | पुढारी

ग्रामपंचायत निवडणूक : गावकारभारी होण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, नेत्यांचे देव पाण्यात!

राशिवडे; प्रवीण ढोणे : कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान रविवार (दि.१८) होत आहे. यंदा सरपंचपदाची निवड थेट जनतेतून केली जाणार असल्याने चुरस निर्माण झाली आहे. गावकारभारी होण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून नेतेमंडळींनी मात्र सत्तेसाठी देवच पाण्यात घातले आहेत.

जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून जनतेतून थेट सरपंच निवड होणार आहे. सरपंच पदासाठी सुमारे १२९३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. साम, दाम, दंडसह भानामतीचे अघोरे उपाय केले जात आहेत. मतदानासाठी दोन दिवस उरले असताना राजकीय वातावरण तापले आहे. सदस्यपदासाठी ८९९५ उमेदवार रिंगणात असले तरी त्यांना थेट सरपंच निवडीमुळे अन्यसाधारण महत्व आहे. आगामी साखर कारखाना, जि. प, पं. स निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आघाडी आकारास आल्या आहेत. त्यामुळे ग्रा.पं.निवडणुका पक्षीय स्तरापेक्षा स्थानिक आघाडींमध्ये होत आहेत. ग्रामीण भागात गटा-गटांमध्ये ईर्षेंचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांना भावनिक करण्यासाठी करणी, भानामती करण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. लिंबू, टाचणी, सुया, गुलाल आदी भानामतीचे साहित्य उमेदवारांच्या घराच्या आसपास आढळून येत आहे. गावकारभारी होण्यासाठी साम, दाम, दंडासह अघोरी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये राजकीय वातावरण तापले आहे. सरपंच निवड थेट जनतेतून असल्याने सदस्यपदाकडे कानाडोळा करत सरपंच आपल्या गटाचाच कसा होईल? यावर भर दिला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button