बुलढाणा : दगडाने ठेचून महिलेचा खून; सैलानीजवळील घटना | पुढारी

बुलढाणा : दगडाने ठेचून महिलेचा खून; सैलानीजवळील घटना

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : बुलढाणा येथील सैलानीबाबा दर्गाह जवळील भडगाव शिवारात एका महिलेचा चेहरा व डोके दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. लता मुरलीधर कोतकर (वय ५०) सुलतानपूर ता. खुलताबाद जि.औरंगाबाद असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रायपूर पोलीसांनी अज्ञात मारेक-यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 सीमाप्रश्नी राज्याची भक्कम बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ साळवे यांची नियुक्ती करा : अजित पवार

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव शिवारात बुधवारी रात्री ९ च्या सुमारास एका अज्ञात महिलेची चेहरा व डोके दगडाने ठेचून हत्या केल्याची महिती रायपूर पोलीसांना मिळाली. याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता मृत महिला औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचे उघडकीस आले. ही महिला पायाच्या उपचारासाठी गेल्या दहा वर्षांपासून सैलानी दर्गाह येथे दर्शनासाठी येत होती. त्यानंतर ती भडगाव शिवारात राहत होती. असे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास रायपूरचे पोलीस उपनिरीक्षक राजवंत आठवले करत आहेत.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button