nana patole : केंद्रात ब्लॅकमेलिंग करणारे सरकार; नाना पटोलेंचा घणाघात | पुढारी

nana patole : केंद्रात ब्लॅकमेलिंग करणारे सरकार; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई; पुढारी ऑनलाईन : nana patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील भाजप नेत्यांसह केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यांनी केंद्रातील सरकार ब्लॅकमेलिंग करणारे सरकार असल्याचा आरोप केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटलांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावा. तसेच काँग्रेसला भाजपच्या आरोपांची भीती नसल्याचेही नाना पटोले यांनी nana patole म्हटले आहे.

कायद्याची लढाई कायद्याने लढा. कोल्हापुरी चपलेनं नको

किरीट सोमय्‍यांकडून माझ्‍यावर करण्‍यात येणार्‍या आरोपामागील मास्टरमाईंड हे भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील हेच आहेत, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उत्तर दिले आहे.

माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रिफांना झोप लागत नाही. कायद्याची लढाई कायद्याने लढा. कोल्हापुरी चपलेनं नको, असा सूचक इशारा पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे.

कोल्हापूरला चाललेल्या किरीट सोमय्यांना कराडमध्ये पोलिसांनी रोखले. या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, आरोप करणाऱ्या सोमय्यांवर जिल्हाबंदीची कारवाई कशासाठी? असा सवाल केला.

ईडीची लढाई लढताना तोंडाला फेस येईल. गृहखाते कामाला लावून राज्यात कारवाई केली जात आहे. पैशाचा माज गृहखात्याच्या काराभारामुळेच, अशा शब्दांत पाटील यांनी मुश्रीफ यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.

महाविकास आघाडीत समन्वय नाहीत. सर्व यंत्रणा मोडण्याचे काम चालले आहे. मला जे शरद पवार माहित आहेत ते अशा कोणत्याही गोष्टीला पाठीशी घालत नाही. पवार अशाप्रकारे चुकीच्या गोष्टीच्या मागे उभे राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.

हे ही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button