पालघर : बिलोशी येथील कारखान्यात टाकीत गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू | पुढारी

पालघर : बिलोशी येथील कारखान्यात टाकीत गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू

वाडा; पुढारी वृत्तसेवा : वाडा तालुक्यातील बिलोशी येथील महेंद्रा रोझिन अँड टरपेंटाईन या कारखान्यात उत्पादन मिश्रीत करणाऱ्या टाकीत उतरलेल्या दोघा कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. सचिन भोईर व किशोर फरले असे मृत कामगारांची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन व किशोर हे दोघे कामगार बिलोशी गावाच्या हद्दीत असलेल्या महेंद्रा रोझिन अँड टरपेंटाईन या कंपनीत अनेक वर्षांपासून काम करत होते. कंपनीत रोझिन व टरपेंटाईन या रंगात लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती केली जाते. या कंपनीत सुमारे २० ते २५ कामगार काम करतात. मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे सचिन टाकीत सफाईसाठी उतरला होता. मात्र गुदमरू लागल्याचे लक्षात येताच त्याने आरडाओरड केली. यावेळी किशोर त्याला वाचविण्यासाठी टाकीमध्ये उतरला मात्र तोही अत्यवस्थ झाला. यानंतर सुरक्षा वापरून अन्य कामगारांनी दोघांना बाहेर काढले.

हेही वाचा :

Back to top button