water purifire : तांब्याचा वापर करून भारतीय संशोधकांनी विकसित केले पाणी शुद्ध करणारे नवे उपकरण | पुढारी

water purifire : तांब्याचा वापर करून भारतीय संशोधकांनी विकसित केले पाणी शुद्ध करणारे नवे उपकरण

नवी दिल्ली : water purifire : शद्ध पेयजल हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. मात्र, पाण्याचेही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते व पाणी शुद्ध करून पिण्यासाठी लोकांची धडपड सुरू होते. त्यासाठी काही छोटी-मोठी उपकरणेही बनलेली आहेत. आता देशातील संशोधकांनी एक असेच छोटे उपकरण बनवले आहे जे तांबे धातूचा वापर करून पाण्याचे शुद्धीकरण करते.

water purifire : तांबे म्हणजे कॉपरमध्ये ऑलिगो-डायनामिक गुणधर्म असतात. हा धातू रोगजंतुरोधक असतो तसेच त्याच्यामध्ये अँटिऑक्सिडंटस् कारक, क्षारीय किंवा पीएचचे संतुलन, उच्च विद्युत व तापमान वाहकता असे गुण असतात. ‘सीएसआयआर-सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रूमेंटस् ऑर्गनायझेशन’ (सीएसआयआर-सीएसआयओ) आणि ‘सीएसआयआर-इन्स्टिट्यूट फॉर मायक्रोबियल टेक्नॉलॉजी (सीएसआयआर-आयएमटेक)च्या संशोधकांनी तांबे धातूचा वापर करून एक रोेगजंतुरोधक जल शुद्धीकरण उपकरण विकसित केले आहे.

water purifire : ते कोणत्याही रुंद तोंडाच्या पाण्याच्या बाटलीत सहजपणे फिट होऊ शकते. हे उपकरण बाटलीतील पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करते. त्यामुळे प्रवासी, नोकरदार, शाळकरी मुलं, मोहिमेतील लोक, गिर्यारोहक आदी अनेक लोकांना बाटलीतील पाणी शुद्ध करून पिणे शक्य होऊ शकेल. विशेष म्हणजे यासाठी बॅटरीची गरज लागत नाही. हे उपकरण अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध प्रभावी आहे.

water purifire : उपकरणाचे परीक्षण जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार एस.ऑरियस, विब्रियो हैजा, साल्मोनेला टाइंफी, पी. एरुगिनोसा आणि ई. कोलायविरुद्ध करण्यात आले. या उपकरणाचा उपयोग करून दोन तासांच्या काळात पाण्याच्या साठ्यात कोणतीही जीवाणूवृद्धी दिसून आली नाही. डॉ. नीलम कुमारी यांनी सांगितले की हे तांब्याचे उपकरण वेळोवेळी तांब्याचे आयन सोडते. ते रोगजंतूंशी संपर्क करून त्यांचा प्रसार रोखतात. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ वॉटर प्रोसेस इंजिनिअरिंग’मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

Back to top button