Virat and Ronaldo : रोनाल्‍डोच्‍या भावूक पोस्‍टवर विराट कोहली म्‍हणाला “तुम्ही माझ्‍यासह प्रत्येक …” | पुढारी

Virat and Ronaldo : रोनाल्‍डोच्‍या भावूक पोस्‍टवर विराट कोहली म्‍हणाला "तुम्ही माझ्‍यासह प्रत्येक ..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेत पोर्तुगालचा संघ उपांत्‍यपूर्व सामन्‍यात पराभूत झाला. संघाला फुटबॉलमध्‍ये विश्‍वविजेता बनविण्‍याचे ख्रिस्तियानो रोनाल्‍डोचे स्‍वप्‍न भंगलं. हा धक्‍का एवढा मोठा होता की रोनाल्‍डोने धाय माकलून रडत मैदान सोडलं.जगभरातील त्‍याचे कोट्‍यवधी चाहतेही हिरमुसले. आता या पराभवानंतर रोनाल्‍डो याने शेअर केलेली भावूक पोस्‍ट सध्‍या चर्चेत आहे. त्‍याचबरोबर या पोस्‍टवर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने दिलेली प्रतिक्रियाही चर्चेचा विषय ठरली आहे. ( Virat and Ronaldo )

यंदाच्‍या फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेत उपांत्‍यपूर्व सामन्‍यात पोर्तुगालचा संघाचा मोरक्कोने पराभव केला. या सामन्‍यात मोरक्‍कोच्‍या के युसुफ नेसरी याने ४२व्‍या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. फुटबॉल विश्‍वचषक विजयाचे पोर्तुगालचे स्‍वप्‍न भंगले. या पराभवानंतर रोनाल्‍डोने धाय माकलून रडत मैदान सोडलं आणि त्‍याचे कोट्यवधी चाहत्‍यांचेही डोळे पाणावले. एक झुंझार फुटबॉलपटू असणार्‍या रोनाल्‍डोचे भावनिक होणे साहजिकच होते. त्‍याच्‍यासाठी हा अखेरचा विश्‍वचषक होता, असे मानले जात आहे.

रोनाल्‍डोची भावूक पोस्‍ट…

पराभवानंतर रोनाल्‍डोने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्‍याने म्‍हटलं आहे, “पोर्तुगालसाठी फुटबॉलचा विश्वचषक जिंकणे हे माझे सर्वात मोठे आणि महत्त्वाकांक्षी स्वप्न होते. सुदैवाने, मी पोर्तुगालसाठी अनेक आंतरराष्ट्रीय विजेतेपदे जिंकली, माझ्या देशाला फुटबॉलमधील जगजेत्ता बनविण्‍यासाठी मी लढलो. या स्वप्नासाठी मी खूप संघर्ष केला. मी पाच विश्‍चचषक स्‍पर्धा खेळल्‍या आहेत. मी नेहमीच संघासाठी माझे सर्वस्व अर्पण केले. नेहमीच लढलो. आपले स्वप्न कधीही सोडले नाही. मला माफ करा कारण आता स्वप्न भंगले आहे.”

 माझ्या देशाकडे कधीच पाठ फिरवणार नाही

पराभवावर बसेच काही सांगितले गेले आहे; परंतु माझी पोर्तुगालवरील भक्ती एका क्षणासाठीही बदलली नाही. मी नेहमीच सर्वांच्या हितासाठी लढत होतो आणि मी कधीही माझ्या देशाकडे पाठ फिरवणार नाही. आता बोलण्यासारखे काही नाही. धन्यवाद पोर्तुगाल, असेही शेवटी त्‍याने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

रोनाल्‍डोने शेअर केलेल्‍या पोस्‍टवरुन त्‍याने पोर्तुगालसाठी शेवटचा सामना खेळला असे मानले जात आहे. कारण रोनाल्‍डो सध्‍या ३७ वर्षांचा आहे. त्‍यामुळे पुढील विश्‍वचषकापर्यंत तो खेळणार का, हा मोठा प्रश्‍न आहे. तसेच त्‍याने पोस्टमध्ये ‘मला माफ करा, आता स्‍वप्‍न भंगले आहे.’ असे लिहलं आहे. त्‍यामुळे तो लवकरच निवृत्ती स्‍वीकारेल, असे मानले जात आहे.

Virat and Ronaldo : विराट काय म्‍हणाला?

रोनाल्‍डोचा फोटो शेअर करत विराट कोहलीने लिहिलं आहे की, रोनाल्‍डो तूम्‍ही फुटबॉल खेळासाठी आणि जगभरातील तुझ्‍या चाहत्‍यांसाठी जे काही केले आहेस ते कोणतीही स्‍पर्धा किंवा करंडक हिरावून घेऊ शकत नाही. माझ्‍यासह अनेकांवर तुमचा असणारा प्रभावाचे वर्णन कोणतीही स्‍पर्धा करु शकत नाही. तुम्‍हाला खेळतान पाहताना वाटतं की देवान दिलेली देणगी आहे. जो माणूस नेहमीच आपले सर्वस्व देतो. कठोर परिश्रम करोत तो समर्पणाचे प्रतीक आहे, तो देवाचा आशीर्वाद आहे, तुम्ही
माझ्‍यासह प्रत्येक खेळाडूचे खरे प्रेरणास्थान आहात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano)

 

 

Back to top button