बिग बॉस मराठी सिझन चौथा : राखी सावंतला भांडी घासावी लागणार.. | पुढारी

बिग बॉस मराठी सिझन चौथा : राखी सावंतला भांडी घासावी लागणार..

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात आज होणार आहे ड्युटी वाटप आणि त्याच्यावरून राखी सावंतला सदस्य स्वतःचं काम स्वतः करण्याचा सल्ला देताना दिसणार आहेत.

अपूर्वाचे म्हणणे आहे, मी आणि अक्षय ब्रेकफास्ट, भांडी, lunch करू. अक्षयचे म्हणणे आहे, प्रत्येकाने आपआपली भांडी घासायची. त्यावर राखी म्हणाली, मी नव्हती घासत. चपाती- भाजी मला करावं लागेल आणि माझी भांडी मी नव्हते करत. अपूर्वाचे म्हणणे आहे मी सगळयांची जी होतील ती भांडी घासेन वैयक्तिक भांडी नाही घासणार.

अमृता धोंगडे म्हणाली, दुपारची भाकरी मी बनवते तुझी. प्रसाद राखीला म्हणाला, जर ती तुझ्यासाठी भाकरी करते आहे तर तुला देखील भांडी घासावी लागणार. तुझी प्लेट तुला घासावी लागणार. अपूर्वा राखीला म्हणाली, हा काय हेकेखोरपणा आहे. राखी म्हणाली, हा हेकेखोरपणा आहे. मी काहीच काम नाही करणार. अमृता देशमुख म्हणाली, तुम्ही धुवू नका तिची प्लेट. तिच्या सगळ्या प्लेट जमा होतील तुझ्या बेडच्या जवळ ढिग होईल तेव्हा कळेल मग तुला.

अपूर्वा म्हणाली, हे सगळं घरी करायचं आपल्या, इकडे नाही करायचे. राखी म्हणाली, हे घर आहे माझं. यावरून बिग बॉसच्या घरात असेच राडे पाहण्यास चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button