Siddharth Chandekar : सिद्धार्थ चांदेकरचं घर आतून दिसतं असं, डेकोरेशन तर पाहा (Video) | पुढारी

Siddharth Chandekar : सिद्धार्थ चांदेकरचं घर आतून दिसतं असं, डेकोरेशन तर पाहा (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यास उत्सुक असतात. (Siddharth Chandekar ) अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचादेखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. आता मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचं घर पाहण्याची पर्वणी चाहत्यांना मिळालीय. सिद्धार्थने आपल्या घराचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. सिद्धार्थचं घर आतून दिसतं तरी कसं पाहा. (Siddharth Chandekar )

सिद्धार्थने आपल्या घराची एक झलक दाखवली आहे. सिद्धार्थने आपल्या घरातील सजावट आणि डेकोरेशन कशा पद्धतीने केली आहे, हे चाहत्यांना पाहायला मिळत आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना A little insight.🏡 अशी कॅप्शन लिहिलीय. वॉलडेकोर, मनी प्लॅन्ट, फ्लॉवर पॉट, पेंटिंग्ज, प्लॅन्ट, मॅप असे डेकोरेशन करून त्याने आपले घर सजवले आहे.

त्याने मोठ्या काचेच्या खिडकीतून बाहेरचे दृश्यदेखील व्हिडिओमध्ये दाखवले आहे.

सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकर हिच्यासोबत लग्न केले आहे. दोघेही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असून ते आपले अपडेट्स चाहत्यांसाठी देत असतात. सिद्धार्थने गुलाबजाम, झिम्मा, ऑनलाईन बिनलाईन, क्लासमेट, झेंडा, मिस यू मिस्टर, कॉफी, रणांगण लॉस्ट ॲण्ड फाऊंड, बेफाम यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तर मिताली मयेकर हिने उर्फी, हॅशटॅग प्रेम, आम्ही बेफिकिर यासारख्या चित्रपटात अभिनय केला आहे.

Back to top button