Cyclone Mandos : ‘मंदोस’मुळे महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पडणार पाऊस | पुढारी

Cyclone Mandos : ‘मंदोस’मुळे महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पडणार पाऊस

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगालच्या उपसागरात बुधवारी (दि. 7) सकाळी ‘मंदोस’ या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे नाव संंयुक्त अरब राष्ट्राने दिले आहे. हे चक्रीवादळ आज गुरुवारी (दि.8) तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता असल्याने या भागातील तेरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Cyclone Mandos) देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील काही भागातही या चक्रीवादळाचे सावट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Cyclone Mandos : वादळाचा प्रभाव 10 डिसेंबरपर्यंत 

नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ ‘मंदोस’ ला “मॅन-डौस” असं म्हंटलं जातं. हवामान विभागाने उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीसाठी चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.  9 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास 85 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पुद्दुचेरी आणि श्रीहरिकोटा बेट ओलांडण्याची शक्यता आहे या वादळाचा प्रभाव 10 डिसेंबरपर्यंत राहील. 10 रोजी रात्री त्याचे पुन्हा कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होऊन ते शांंत होईल. सध्या हे चक्रीवादळ श्रीलंकेपासून 500 कि.मी., तर चेन्नईपासून 770 कि.मी. अंतरावर आहे. आगामी 48 तासांत ते तामिळनाडू, पुद्दुचेरी पार करून आंध्रप्रदेश किनारपट्टीवर येणार असल्याने दक्षिण भारतातील सर्वच किनारपट्ट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात तुरळक भागांत हलका पाऊस

‘मंदोस’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे येत असल्याने ढगाळ वातावरण तयार होऊन तुरळक भागांत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने 8 व 9 रोजी कोकण, तर 9 रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. या वातावरणामुळे राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होऊन, असे वातावरण 11 डिसेंबरपर्यंत राहील. दरम्यान, महाराष्ट्रातील कोकणात 8 व 9 रोजी, तर मध्य महाराष्ट्रात 9 रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. ‘मंदोस’ चक्रीवादळाचा वेग बुधवारी सकाळी ताशी 50 ते 60 कि.मी. इतका होता. रात्री तो 70 ते 80 कि.मी. झाला. गुरुवारी (8 डिसेंबर) हा वेग 80 ते 90, तर शुक्रवारी 100 कि.मी.वर जाईल, असा अंदाज आहे.

हेही वाचा

Back to top button