दिल्ली महापालिका निवडणूक : बुधवारी मतमोजणी | पुढारी

दिल्ली महापालिका निवडणूक : बुधवारी मतमोजणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील तीन महानगर पालिकांच्या एकत्रिकरणानंतर पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या दिल्ली महापालिका निवडणूक  निकाल बुधवारी (दि.७) लागणार आहे. सकाळी आठपासून राज्यातील ४२ केंद्रावर मतमोजणी सुरू होईल. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रीय सशस्त्र बलाच्या २० कंपन्या तसेच १० हजार पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहेत.

शास्त्री पार्क, यमुना विहार, मयुर विहार, नंदनगरी, द्वारका, ओखला, मंगोलपुरी, पितमपुरा, अलीपूर तसेच मॉडल टॉऊन परिसरातील मतमोजणी केंद्रांना छावणीचे स्वरूप आले आहे.

सोमवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आलेल्या बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी पालिकेत यंदा आम आदमी पक्ष सत्तारूढ होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. आप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. १५ वर्षानंतर महापालिकेत सत्तांतराची शक्यता असल्याचा कल या मतदानोत्तर चाचण्यातून दिसून आला आहे. त्यामुळे भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button