हिंगोली : युरोपातील ‘भोवत्या’चा वडहिवर्‍याच्या जंगलात मुक्‍काम; पक्षी प्रेमींसाठी पर्वणी | पुढारी

हिंगोली : युरोपातील 'भोवत्या'चा वडहिवर्‍याच्या जंगलात मुक्‍काम; पक्षी प्रेमींसाठी पर्वणी

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : पूर्व युरोपात सध्या बर्फवृष्टी सुरू असल्याने तेथील सात ते आठ भोवत्या पक्षी सेनगाव तालुक्यातील वडहिवरा जंगलात मागील पंधरा दिवसांपासून मुक्‍कामी आले आहेत. या परदेशी पक्षांचे वनविभागाने स्वागत केले असून तशी नोंद केली आहे. या पक्षांच्या आगमन ही पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणी ठरली आहे.

पूर्व युरोपात भोवत्या पक्षांचा वावर आहे. या पक्षाला इंग्रजीत पालीयड हराहीर तर हिंदी भाषेत गिरगीटमार असे म्हटले जाते . सध्या पूर्व युरोपात बर्फवृष्टी होत असल्याने उष्ण वातावरण मिळेल तिथे हे पक्षी आश्रयास येतात.  वडहिवरा परिसरात जवळपास दीडशे हेक्टर जंगल आहे. तसेच  इतर ठिकाणाच्या तुलनेत या जंगलात उष्ण वातावरण असल्याने गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून हे पक्षी येथे दाखल झाले आहेत.

या पक्षाचे खाद्य होला, चंडाळ, चिमणी, नागतोडा, सरडा, पाली, गोम व इतर छोटे पक्षी आहेत. पूर्व युरोपात बर्फवृष्टीमुळे जवळपास दीड महिना हे पक्षी येथे मुक्‍कामी राहणार आहेत. जंगलात कोतवाल, चंडोल, माळ टिटवी, चिमणी, मैना, भागपाडी मैना, पोपट, टोईपोपट, सिकंदर पोपळ, रंगीत तित्तर, गाय बगळा, पानकावळा, खड्या, चित्रबाळग, कावळा, राखीधनुष, रक्‍तलोचक घुबड, कोकीळा आदीचा वावर असल्याने  भोवत्याचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.

भोवत्या पक्षी आकाराने घारीपेक्षा लहान असतो. हा वर्णाने पिवळट, राखी करडा असतो. भोवत्याचे पंख अरूंद असतात. पंखाची टोके काळी असून, हवेत उडताना पंख ठळकपणे दिसतात. शेतातल्या उभ्या पिकातून तसेच कुरणावरून उडताना तो रूबाबदार दिसतो.

नांदेड विभागाचे उप वनसंरक्षक केशव वाबळे

हेही वाचा :

 

 

Back to top button