बिग बॉस मराठी 4 : राखी VS आरोह- तुझ्या बापाचं काय जातं? दोघांमध्ये खडाजंगी | पुढारी

बिग बॉस मराठी 4 : राखी VS आरोह- तुझ्या बापाचं काय जातं? दोघांमध्ये खडाजंगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरातून काल रोहित शिंदेला घराबाहेर पडावे लागले. आता हा आठवडा कोणता सदस्य गाजवणार ? पुढच्या आठवड्यात कोण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार ? हे त्या सदस्याचा गेम ठरवेल. आज घरात पार पडणार आहे “शाई फेक” हे नॉमिनेशन कार्य. कोण कोणाला नॉमिनेट करणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे कारण घरात २ नवे सदस्य आहेत जे या आठवड्यापासून नॉमिनेशन कार्यात सहभागी होऊ शकणार आहेत मजह्णजेच सदस्य त्यांना देखील नॉमिनेट करू शकणार आहेत.

आरोहचे म्हणणे आहे, राखी प्रत्येकवेळा कुरघोड्या करणं, गळ्यात लिंबू मिरची लटकवण हे चर्चेत राहण्यासाठी करते. राखीचे त्यावर म्हणणे आहे, मी याच्यासारखी पूर्ण दिवस झोपून राहात नाहीये. त्यावर आरोह म्हणाला, तुझ्या बापाचं काय जातं. त्यावरून राखी आणि आरोहमध्ये सुरु झाली खडाजंगी… बघूया पुढे काय झाले आजच्या भागामध्ये.

Back to top button