उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदाची हौस आता फिटली ; चित्रा वाघ | पुढारी

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदाची हौस आता फिटली ; चित्रा वाघ

धुळे : पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदाची हौस आता फिटली आहे. त्यांना महिला मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडत आहे. संविधानाने महिला आणि पुरुष असा भेद केलेलाच नाही. आम्ही संविधानाचा सन्मान करतो. त्यामुळे महिला आणि पुरुष असा भेदभाव मानत नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रविवारी धुळ्यात केली.

भाजपची महिला आघाडी महिला सुरक्षेच्या विषयावर काम करते. त्याप्रमाणे आता प्रत्येक बूथवर २५ महिला उपस्थित राहणार आहेत. तसेच आगामी निवडणुकांमध्ये महिला सक्रिय कार्य करणार आहेत. त्यामुळेच लोकसभेत ४५ हून अधिक, तर विधानसभेत २०० हून अधिक जागा भारतीय जनता पक्ष आणि युती घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आजच्या पिढीला फ्रेंडशिपसाठी अॅपची गरज लागते. यावरून पालक आणि पाल्यांमधील संवाद हरवत चालला आहे का, याची उजळणी करण्याची गरज असल्याचेही वाघ यांनी सांगितले. सद्यस्थितीत अल्पवयीनांना फूस लावून पळवण्याच्या प्रकार पाहता तसेच जबरीने केले जाणारे धर्मांतर यासाठी सक्षम कायदा असला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारप्रमाणेच महाराष्ट्रामध्येही लव्ह जिहाद रोखण्यासाठी सक्षम कायदा असावा, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

Back to top button