पुणे : धार्मिक संस्थांना मिळकत करात सवलत द्या | पुढारी

पुणे : धार्मिक संस्थांना मिळकत करात सवलत द्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका हद्दीतील धार्मिक संस्थांना मिळकत करात सवलत द्यावी, अशी मागणी विविध ट्रस्टकडून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य सभेत 2005 साली धार्मिक स्थळांना कर माफी ठराव मंजूर करण्यात आला होता.

म.न.पा. कायदा कलम 132 मध्ये नमूद केल्याप्रमाणे धार्मिक स्थळ व प्राथमिक शाळा यांना कर सवलत देण्याचा उल्लेख आहे. पुण्यातील अनेक धार्मिक स्थळे ही शिवकालीन, पेशवेकालीन, तसेच ब्रिटिशकालीन आहेत. या सर्व धार्मिक संस्थांना सरकारने कर माफ करावा, असे संजय बालगुडे, नरेंद्र व्यवहारे, डी. के. कांबळे, वी. स. हाडळे, नितीन पंडित, भाऊसाहेब करपे, प्रकाश बहादरपुरे, जाहिदभाई शेख आदींनी निवेदनात म्हटले आहे.

Back to top button