FIFATROL : बाह्य श्वसन यंत्रणेतील संसर्गावर ‘फीफाट्रोल’ गुणकारक | पुढारी

FIFATROL : बाह्य श्वसन यंत्रणेतील संसर्गावर 'फीफाट्रोल' गुणकारक

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : बाह्य श्वसन यंत्रणेत होणाऱ्या संसर्गामुळे खोकला, कफ अथवा कोरड्या खोकला होता. थंडी, वायू प्रदूषणामुळे अशाप्रकारचे संसर्ग होवू शकतो. या संसर्गांमुळे वर्षाकाठी जगाला २२ अब्ज डॉलरचा आर्थिक बोजा सहन करावा लागतो. याअनुषंगाने आयुर्वेदिक प्रतिजैविक म्हणून ‘फीफाट्रोल’वर (FIFATROL) करण्यात आलेल्या अध्ययनाअंती सकारात्मक निष्कर्ष मिळाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. अवघ्या आठवड्याभरात बाह्य श्वसन यंत्रणेच्या संसर्गातून या औषधामुळे मुक्तता मिळते, असा दावा शोधार्थ्यांनी केला आहे.

देशातील विविध आरोग्य केंद्रावरील रुग्णांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष हाती आले आहेत. उत्तर प्रदेश तसेच उत्तराखंडमधील शोधार्थ्यांनी केलेल्या या अध्ययनापूर्वी भोपाळ एम्समधील डॉक्टरांनी संसर्ग, जीवाणू तसेच बुरशीजन्य संसर्ग आठवड्याभरात नियंत्रित करण्यासाठी फीफाट्रोल (FIFATROL) रामबाण औषध असल्याचा दावा केला होता.

आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल ऑफ आयुर्वेदा अँड योगामध्ये या अध्ययनासंबंधी पेपर प्रकाशित करण्यात आला आहे. फीफाट्रोलमधील सुदर्शन वटी, संजीवनी वटी, गोदांती भस्म, त्रिभुवन कीर्ति रस तसेच मृत्यूंजय रस रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासह संसर्ग, जीवाणू तसेच परजीवांमूळे होणाऱ्या संसर्गजन्य घातक प्रभावांना कमी करण्यात गुणकारक ठरतात. औषधातील वनौषधी विशेष लाभकारक आहेत. त्रिभुवन कीर्ति रस सर्दी कमी करतो. संजीवनी वटी शरीराचे तापमान सामान्य करण्यात मदत करते. तुळस तसेच गोदांती भस्मात संसर्गाविरोधात लढा देण्याचे गुण आहेत.

डिसेंबर २०१९ ते एप्रिल २०२२ दरम्यान उत्तराखंड येथील मदरहुड विद्यापीठ, गाझियाबाद येथील आयएमटी तसेच देहराडून मधील उत्तरांचल आयुर्वेद महाविद्यालयातील शोधार्थींनी संयुक्तरित्या हे अध्ययन पूर्ण केले. देशभरातील विविध आरोग्य केंद्रावर उपचार घेत असलेल्या २०३ रुग्णांवर फीफाट्रोल च्या परिणाचा अभ्यास केला. उपचारादरम्यान पहिल्या, चौथ्या तसेच सातव्या दिवशी रुग्णांना विविध मापदंडावर तपासणी करण्यात आली. या दिवशी त्यांना दिवसातून दोनदा फीफाट्रोल औषध देण्यात आले. अभ्यासानुसार, चौथ्या दिवशी रुग्णाच्या लक्षणामध्ये ६९.५ टक्के आणि सातव्या दिवशी ९०.३६ टक्के सुधारणा दिसून आली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button