
पुढारी ऑनलाईन डेस्क : मंदिरांच्या आवारात पावित्र्य राखण्यासाठी मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने राज्यातील धर्मादाय आयुक्तांना दिला आहे. ( Mobile Phones and Temple )
तिरुचेंदूर येथील अरुल्मिगु सुब्रमणिया स्वामी मंदिरात मोबाईल फोन वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सीतारामन यांनी दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती आर. महादेवन आणि जे. सत्यनारायण प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
या वेळी खंडपीठाने स्पष्ट केले की, मंदिर परिसरातच्या पावित्र्य आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांनी मंदिराच्या आवारात मोबाईल फोन वापर बंदीसाठी योग्य ती पावले उचलली पाहिजेत. मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांचा वापर भाविकांचे लक्ष विचलित करतो.
मदुराई मीनाक्षी अम्मान मंदिर, गुरुवायूर येथील श्री कृष्ण मंदिर आणि तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात मोबाईल फोनवर आधीच बंदी आहे. मंदिर प्रशासनाने तिरुचेंदूर मंदिरात मोबाईल फोनवर बंदी घातली आहे. तसेच तमिळनाडूमधील सर्व मंदिरांमध्ये मोबाईल फोन वापरावर बंदी घालण्यात यावी, असा आदेश खंडपीठाने दिला.
हेही वाचा :