राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद; जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते : सदाभाऊ खोत | पुढारी

राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद; जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते : सदाभाऊ खोत

पुणे; पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते कारण जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. राज्यकर्ते बोलायचे असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते. त्यांच्या पाठीवर हाथ ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत असे पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या क्रायक्रमात क्रांती संघटनेचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, मंत्री लोकांना डोकी जास्त दिसली कि जे नको तेही बोलून जातात. एखादा मंत्री बोलतो असतो आणि त्याचा व्हिडिओ झालेला असतो. मला वाटत अधिवेशन घ्या आणि मंत्र्यांना बोलवा. संघटित होऊन प्रश्न सोडवावे लागतील. सगळ्या मजल्यावर बसलेलं अधिकारी ड्राफ्ट तयार करत असतात. मी मंत्री राहिलो आहे. आम्ही फक्त वाचतो आणि ते सगंतील तशी सही करतो. ५० टक्के मंत्र्याचे काम हा अधिकारीच करत असतो. म्हणून मला वाटतं तुम्ही सगळे संघटतीत राहा असेही खोत म्हणाले.

हा कार्यक्रम अर्हम फाउंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने “संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी” पुण्यात पत्रकार संघात आयोजित केला होता. या वेळी आ.बच्चू भाऊ कडू, आ.अभिमन्यू पवार, आ.गोपीचंद पडळकर, आ.निरंजन डावखरे उपस्थित होते

Back to top button