Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टीची घोडदौड कायम, सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक | पुढारी

Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टीची घोडदौड कायम, सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

Stock Market Updates : शी जिनपिंग यांच्या झीरो कोव्हिड धोरणाविरुद्ध चीनमध्ये लोकांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील तीन प्रमुख निर्देशांक घसरले आहेत. तर आशियाई शेअर बाजारात संमिश्र वातावरण आहे. पण जगातील घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आलेला नाही. आज मंगळवारी (दि.२९) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १९० अंकांनी वाढून ६२,७०० च्या जवळ गेला. तर निफ्टी १८,६०० वर पोहोचला. सेन्सेक्स आणि निफ्टीचा हा नवा उच्चांक आहे. काल मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. काल सोमवारी सेन्सेक्स २११ अंकांनी वाढून ६२,५०४ वर तर निफ्टी ५० अंकांनी वाढून १८,५६२ वर बंद झाला होता. आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे.

हिंदाल्को, अपोलो हॉस्पिटल्स, सिप्ला, ब्रिटानिया आणि टायटन हे आज NSE वर सर्वाधिक १.०६ टक्क्यांपर्यंत वाढलेल्या शेअर्समध्ये होते. याउलट बीपीसीएल, एसबीआय लाईफ, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी बँक यांचे शेअर्स मागे पडले आहेत. बीएसईवर १,७१० शेअर्स वाढताना दिसत होते तर ७१० शेअर्स घसरत होते.

चीनमध्ये कोविड धोरणाविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आशियातील बाजारात संमिश्र राहिले आहे. दक्षिण कोरियाचा KOSPI ०.३५ टक्क्यांनी तर शांघाय कंपोझिट निर्देशांक १.६३ टक्क्यांनी वाढला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ३.४४ टक्क्यांनी वधारला आहे. तर जपानचा निक्केई निर्देशांक ०.५८ टक्क्यांनी घसरला.

हे ही वाचा :

Back to top button