चिंचपूर पांगूळ परिसरात लम्पीचा प्रादुर्भाव | पुढारी

चिंचपूर पांगूळ परिसरात लम्पीचा प्रादुर्भाव

चिंचपूर पांगूळ; पुढारी वृत्तसेवा : चिंचपूर पांगूळ, वडगाव, ढाकणवाडी येथे लम्पीमुळे अनेक जनावरे बाधित झाली आहेत. त्यामुळे शेतकरी मात्र चांगलेच धास्तावले आहेत. परिसरात काही दिवसांपासून लम्पी आजाराने डोके वर काढले आहे. पशुसवर्धन विभागामार्फत मोफत लसीकरण, तसेच लम्पीबाधित जनावरांना उपचार करण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकर्‍यांनी या आजाराचे जनावरांना लक्षण दिसताच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती दिली आहे.

सध्या ढाकणवाडी,वडगाव येथील तीन बैल तिसगाव विलगीकरण केंद्रात ठेवण्यात असून, एक बैलाचा काल सकाळी मृत्यू झाला. इतर सहा ते सात बाधित जनावरांवर गावातच इतर जनावरांपासून वेगळे करून उपचार सुरू आहेत. वडगाव परिसरात लम्पीने हळूहळू हातपाय पसरण्यास सुरूवात केली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडतात की काय? अशी भीती शेतकर्‍यांना वाटू लागली. जनावरांना लसीकरण घ्यावे, बाहेरगावांहून जनावरे आणणे टाळावे, गोठ्याची फवारणी करावी, स्वछता पाळावी, बाधित जनावर त्वरित वेगळे करून पशुसंवर्धन विभागास कळवणे व उपचार सुरू करणे इत्यादी काळजी शेतकर्‍यांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

Back to top button