उत्तर पश्चिम वाऱ्यांमुळे दिल्लीकरांना तूर्त दिलासा; वायू गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीत | पुढारी

उत्तर पश्चिम वाऱ्यांमुळे दिल्लीकरांना तूर्त दिलासा; वायू गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीत

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील हवा गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे पंजाबमध्ये शेतातील पाचट जाळण्याच्या घटनांमध्ये वाढल्या असतांना देखील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) गंभीर श्रेणीत पोहचलेला नाही. वातावरणातील अनुकूल बदलामुळे हा दिलासा मिळाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पुढील दोन दिवसांमध्ये वातावरणात विशेष बदल होणार नसल्याने एक्यूआय अत्यंत खराब श्रेणीतच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी सकाळी एनसीआरमधील नोएडात एक्यूआय ३५३, तर दिल्लीचा एक्यूआय ३३७ नोंदवण्यात आला. उत्तर-पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शेतातील पाचट जाळल्यामुळे होणार धुर दिल्ली-एनसीआरमधील टिकाव धरत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय वायू मानक संस्था ‘सफर इंडिया’ने येत्या दोन दिवसांत वाऱ्यांचा वेग ताशी १५ ते २६ किलोमीटर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान उत्तर-पश्चिम दिशेने हे वारे वाहत असल्याने पाचट जाळल्यानंतरचा धूर दिल्ली-एनसीआरमध्ये पोहोचेल. वाऱ्यामुळे हे प्रदूषण फार टिकाव धरणार नसले तरी वायु गुणवत्ता निर्देशांकात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हीही वाचा :

Back to top button