

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आव्हाड यांना काल शुक्रवारी अटक करण्यात आली होती. दरम्यान, आव्हाड यांचे वकील ॲड. प्रशांत कदम हे आजच आव्हाडांच्या जामिनासाठी कोर्टात अर्ज करणार आहेत. थोड्याच वेळात यावर पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार असून यामध्ये सरकारी वकील आणि आव्हाड यांच्या वकिलांमध्ये युक्तिवाद होणार आहे. त्यामुळे आव्हाडांना जेल होणार की बेल मिळणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर न्यायालयात सुनावणीला सकाळी 11 वाजता सुरुवात सुरुवात करण्यात आली. यावेळी आव्हाड यांचे वकील ॲड प्रशांत कदम यांनी आव्हाड यांची अटक कशी बेकायदेशीर आहे यावर युक्तिवाद केला. आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असून हे गुन्हे जाणीवपूर्वक दाखल करण्यात आले असल्याचे कदम यांनी सांगितले. आव्हाड यांना जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा जामीनपात्र कलम लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर यामध्ये सेक्शन 7 हे कलम जाणीवपूर्वक लावण्यात आले. हे कलम ठाणे शहरात लागू करू शकत नसल्याचे सांगत तशी तरतूद 1932 साली करण्यात आली आहे असा दावा ॲड प्रशांत कदम यांनी न्यायालयात केला. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी देखील स्वतःहून चौकशी करता पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे सांगत तपासाला पूर्ण सहकार्य केले असल्याचे कदम यांनी न्यायालयात सांगितले. ही अटक पुर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावाही ॲड कदम यांनी न्यायालयात केला.
आव्हाडांना जेव्हा ताब्यात घेण्यात आले त्यावेळी आयपीसी 141,143,146,149,323,504, महाराष्ट्र पोलीस कायद्यातील 37(3), 135 हे कलम लावण्यात आले होते. त्यानंतर यामध्ये कलम 7 वाढवून त्यांना तसेच त्यांच्या सोबत 11 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांची बाजू मांडताना सरकारी वकील ॲड. अनिल नंदगिरी यांनी आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांकडे पुरावे असून त्यामुळे त्यांच्या कस्टडीची मागणी त्यांनी यावेळी नायायालयात केली. या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर हा निकाल एक तास निकाल राखून ठेवण्यात आला. त्यानंतर आव्हाड यांना पुन्हा वर्तक नगर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. यावेळीही वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या बाहेरही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
जितेंद्र आव्हाड यांना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबवस्त ठेवण्यात आला होता. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी करत घोषणाबाजी देखील केली. खवबरदारीचा उपाय म्हणून कोर्ट नाक्याकडे येणारे दोन्ही मार्ग पोलिसांनी बंद केले होते. सुनावणी झाल्यानंतर आव्हाडांना न्यायालयाच्या बाहेर आणण्यात आले तेव्हा कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
-अटक बेकायदशीर, आव्हाड स्वतः पोलीस ठाण्यात गेले
– अटकेच्या ७२ तास आधी नोटीस देणे आवश्यक
– कलम ७ ठाण्यात लागू करण्यात येऊ शकत नाही
– आव्हाड यांच्या विरोधात पोलिसांकडे पुरावे
– त्यामुळे आव्हाड यांची पोलीस कस्टडी आवश्यक
– मला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव
– माझी अटक बेकायदेशीर
सोमवारी 7 नोव्हेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये 'हर हर महादेव' या मराठी चित्रपटाचा शो सुरू होता. या चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शो बंद पाडला. यावेळी काही प्रेक्षकांना आव्हाडांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मनसेनं यासंदर्भात टीका केल्यानंतर आव्हाडांविरोधात वर्तकनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा-कळवा मतदारसंघात असलेल्या आणि अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कळवा उड्डाणपुलाचे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होणार असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील आमंत्रण देण्यात आले आहे. या उड्डाणपुलाचे उद्घाटन लवकर करावे अशी मागणी यापूर्वी दोन वेळा स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यामुळे खारेगांव उड्डाणपुलाप्रमाणे तिसऱ्या उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई सुरु झाली होती. आव्हाड यांना जमीन न झाल्याने आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्यानंतर ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये जेलची भीती काय दाखवता फासी द्या असे आव्हान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बॅनरच्या माध्यमातून दिले आहे. इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नसल्याचे या बॅनरमध्ये नमूद करण्यात आले आहे. ठाण्यात लावण्यात आलेला हा बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
हे ही वाचा :