मुंबई : अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढणार? | पुढारी

मुंबई : अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढणार?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सीबीआयच्या प्रकरणात कथित आर्थिक अफरातफर प्रकरणी अटकेत असलेल्या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा कारागृहातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. विशेष सीबीआय न्यायालयाच्या जामीन नाकारल्याच्या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. हे अपील ॲड. अनिकेत निकम यांनी आज सकाळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या निर्शनास आणून दिले. यावेळी न्यायालयाने दुपारी अडीज वाजता सुनावणी ठेवली आहे.

यावेळी न्यायालय अपीलावर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शविण्याची शक्यता आहे. या पूर्वीही याच न्यायाल्यायाने देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे हे अपील न्यायमूती एस. के. शिंदे यांच्या समोर सुनावणीला येण्याची शक्यता आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी दिवाळीपूर्वी फेटाळून लावला होता. त्या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. हे अपील सुटीकालीन न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी त्याची दखल घेऊन नियमित न्यायालयासमोर 11 नोव्हेंबरला सुनावणी निश्चित केली होती. आज ॲड. निकम यांनी हे अपील न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा :   

Back to top button