T20 WC : वर्ल्ड कप नंतर ‘हा’ दिग्गज कर्णधारपद सोडणार! | पुढारी

T20 WC : वर्ल्ड कप नंतर ‘हा’ दिग्गज कर्णधारपद सोडणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 WC T20 World Cup 2022 Semi Final : टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघाचा कर्णधार लवकरच कर्णधारपद सोडू शकतो. असा खुलासा एका माजी दिग्गज खेळाडूने केला आहे. हा खेळाडू आतापर्यंत या स्पर्धेत फलंदाज म्हणून पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

‘हा’ कर्णधार कर्णधारपद सोडू शकतो..

टी 20 विश्वचषक (T20 WC) स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 9 नोव्हेंबर रोजी सिडनी येथे . खेळवळा जाणार आहे. तर स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या मोठ्या सामन्यांपूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या पुढील हंगामापूर्वी तो कराची किंग्ज संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होऊ शकतो.

‘या’ दिग्गज खेळाडूचा खुलासा…

क्रिकेट पाकिस्तानच्या वृत्तानुसार, कराची किंग्ज संघाचे संचालक वसीम अक्रम यांनी हा मोठा खुलासा केला आहे. बाबर आझमला आता संघासोबत राहायचे नाही. फ्रँचायझी लवकरच नवीन कर्णधाराची घोषणा करू शकते. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली गेल्या मोसमात या संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. त्याचवेळी बाबर आझम दुसऱ्या सत्रापासून या संघाशी जोडला गेला आहे.

बाबर टी 20 विश्वचषक 2022 मध्ये फ्लॉप (T20 WC)

2022 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत बाबर आझम (Babar Azam) आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. बाबर आझमने या स्पर्धेत आतापर्यंत 5 सामन्यात 7.80 च्या सरासरीने केवळ 39 धावा केल्या आहेत. या 5 डावांमध्ये बाबर आझमने केवळ एकदाच 20 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Back to top button