Virat Kohli ICC Award : ‘किंग कोहली’ची ICC पुरस्कारावर मोहोर, ठरला सर्वोत्कृष्ट क्रिकेटर

Virat Kohli ICC Award : ‘किंग कोहली’ची ICC पुरस्कारावर मोहोर, ठरला सर्वोत्कृष्ट क्रिकेटर

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli ICC Award : एक काळ असा होता जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा दबदबा पाहायला मिळत होता, पण गेल्या काही वर्षात किंग कोहलीच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, मात्र ऑक्टोबर 2022 पासून विराट कोहलीचे नशीब बदलू लागले आहे. त्याची बॅट पुन्हा एकदा तळपू लागली आहे. तो धावांचा पाऊस पाडत आहे. कोहलीच्या टी 20 क्रिकेटमधील या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli ICC Award) बॅट सध्या धुमाकूळ घालत आहे. कोहलीसोबतच झिम्बाब्वे संघाचा सिकंदर रझा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांनाही पुरुष गटात या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. पण या पुरस्कारावर कोहलीने मोहोर उमटवली. कोहलीला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला हा सन्मान मिळाला आहे.

34 वर्षीय विराट कोहली (Virat Kohli ICC Award) जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देत होता. मात्र आशिया चषक स्पर्धेपासून त्याला लय पुन्हा गवसली आहे. या टी 20 विश्वचषकात कोहलीने आतापर्यंत सर्वाधिक 246 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीने या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान (नाबाद 82), नेदरलँड्स (नाबाद 62) आणि बांगलादेश (नाबाद 64) विरुद्ध तीन अर्धशतके झळकावली आहेत.

टी 20 विश्वचषक 2022 मधील विराट कोहलीचे प्रदर्शन

सामने : 5
धावा : 246 (सुपर 12 फेरीपर्यंत)
फिफ्टी : 3
सरासरी : 123

आयसीसीने सोमवारी (7 नोव्हेंबर) ऑक्टोबरसाठी पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला. पुरुषांमध्ये कोहलीने, तर महिलांमध्ये पाकिस्तानच्या निदा दारने हा किताब पटकावला. कोहलीने ऑक्टोबर महिन्यात 4 टी-20 सामने खेळले. यादरम्यान दोन अर्धशतके झळकली. यामध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली. अलीकडेच, विराट कोहली टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने एकूण 26 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 83.92 च्या सरासरीने 1091 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीचा (Virat Kohli ICC Award) हा पहिला आयसीसी पुरस्कार नाही. याआधीही त्याने ICC क्रिकेटर ऑफ द इयर, क्रिकेटर ऑफ द डिकेड, ODI क्रिकेटर ऑफ द डिकेड, ODI प्लेयर ऑफ द इयर, टेस्ट प्लेयर ऑफ द इयर असे अनेक पुरस्कार जिंकले आहेत. एका कॅलेंडर वर्षात सर्व आयसीसी वार्षिक वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे. 2018 मधील त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर, कोहलीला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी, ICC कसोटी आणि ODI प्लेयर ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news