Chittah ReIntroductry : सर्व चित्ते निरोगी, सक्रिय आणि व्यवस्थित जुळवून घेणारे आहेत हे जाणून आनंद झाला – पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

Chittah ReIntroductry : सर्व चित्ते निरोगी, सक्रिय आणि व्यवस्थित जुळवून घेणारे आहेत हे जाणून आनंद झाला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chittah ReIntroductry : “छान बातमी! मला सांगण्यात आले आहे की अनिवार्य अलग ठेवल्यानंतर, कुनोच्या अधिवासात आणखी जुळवून घेण्यासाठी 2 चित्त्यांना एका मोठ्या बंदोबस्तात सोडण्यात आले. इतरांना लवकरच सोडण्यात येईल. तसेच सर्व चित्ते निरोगी, सक्रिय आणि व्यवस्थित जुळवून घेणारे आहेत हे जाणून आनंद झाला,” असे ट्विट पंतप्रधानांनी केले.

Chittah ReIntroductry : “छान बातमी! मला सांगण्यात आले आहे की अनिवार्य अलग ठेवल्यानंतर, कुनोच्या अधिवासात आणखी जुळवून घेण्यासाठी 2 चित्त्यांना एका मोठ्या बंदोबस्तात सोडण्यात आले. इतरांना लवकरच सोडण्यात येईल. तसेच सर्व चित्ते निरोगी, सक्रिय आणि व्यवस्थित जुळवून घेणारे आहेत हे जाणून आनंद झाला,” पंतप्रधानांनी ट्विट केले.

Chittah ReIntroductry : भारतातून नष्ट झालेल्या चित्त्यांना भारतात पुन्हा आणणण्यासाठी चित्ता पुनर्स्थापन या प्रकल्पाअंतर्गत दक्षिण अफ्रिकेच्या नामिबियातून 8 चित्त्यांना भारतात आणण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढदिवशी दि. 17 सप्टेंबरला या चित्त्यांना मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. दक्षिण अफ्रिकेच्या नामिबियातील चित्ते भारतातील वातावरणाशी जुळवून घेतील का नाही याबाबत अनेकजण साशंक होते.

Chittah ReIntroductry : अनेक तज्ज्ञांच्या मते दक्षिण आफ्रिकेतील वातावरण आणि जंगले खूप वेगळी आहे. त्यामानाने भारतात तसे वातावरण नाही. त्यामुळेच चित्त्यांसाठी कुनो उद्यानात खास व्यवस्था करण्यात आली होती. चित्त्यांना भारतात येऊन दीड महिना उलटला असून अद्याप सर्व चित्ते स्वस्थ आणि निरोगी आहेत. सुरुवातीला या चित्त्यांना विलगीकरण करून ठेवण्यात आले होते. दीड महिन्याच्या निरीक्षणानंतर आठ पैकी दोन चित्त्यांना आता मोठ्या बंदोबस्तात उद्याानात मोठ्या अधिवासात सोडण्यात आले आहे.

याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आणि चित्ते निरोगी, सक्रिय आणि व्यवस्थित जुळवून घेणारे आहेत, हे जाणून घेऊन आनंद झाला आहे.

हे ही वाचा :

Chittah Welcom to India …असे आहे चित्त्यांचे नवे घर!

Chittah In India : कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्याच्या वेगाचा थरार… पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुनर्स्थापन

Back to top button