Chittah In India : कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्याच्या वेगाचा थरार… पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुनर्स्थापन

Chittah In India : कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्याच्या वेगाचा थरार… पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुनर्स्थापन

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chittah In India नामिबियातून भारतात आणण्यात आलेले 8 चित्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 11 च्या सुमारास मध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांसाठी खास बांधलेल्या निवाऱ्यांमध्ये सोडण्यात आले. पिंज-याचे दार उघडून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या चित्त्यांना कुनोमध्ये पुनर्स्थापन करण्यात आले. चित्त्याची वेगवान दौड भारतीयांना तब्बल 70 वर्षांनी अनुभवता येणार आहे. 70 वर्षांपूर्वी भारतातून चित्ता नामशेष झाला होता. त्या पार्श्वभूमीवर चित्ता रि इन्ट्रोडक्शन हा प्रकल्प भारताच्या जैवविविधतेच्या साखळीत काय बदल घडवून आणेल, हे पाहणे महत्वाचे आहे.

Chittah In India चित्त्यंना मुक्त केल्यानंतर मोदी यांनी त्यांचे चित्र कॅमे-यात कैद केले. चित्त्यांना मुक्त केल्यानंतर मोदी यांनी त्यांच्याजवळील कॅमे-यात चित्त्यांच्या पहिल्या चालीचे छायाचित्र टिपले. गेल्या अनेक दिवसांपासून नामिबियातून चित्त्यांना भारतात आणून पुन्हा एकदा चित्त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार होते. त्या बहुप्रतिक्षीत चित्त्यांची प्रतीक्षा आज अखेर संपली. आज सकाळी विमानाने नामिबियातील 8 चित्ते दाखल झाले. एकूण आठ चित्ते नामिबियातून भारतात आणण्यात आले आहे. यामध्ये 5 मादी आणि तीन नर आहेत. आज सकाळी विमानाने हे चित्ते ग्वाल्हेर येथे पोहोचले. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरमधून कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले.

या चित्त्यांना आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांसाठी खास बांधलेल्या निवाऱ्यांमध्ये सोडण्यात आले. चित्त्यांना भारतात पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने खास चित्ता री-इंट्रोडक्शन प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पा अंतर्गत मोठी प्रक्रिया पूर्ण करून अखेर हे चित्ते भारतात दाखल झाले आहेत. त्यामुळे वन्यजीव प्रेमींना आता कुनो राष्ट्रीय उद्यानात हे चित्ते पाहण्याची संधी मिळणार आहे.

…असा झाला होता भारतातून चित्ता नामशेष! Chittah In India

भारतातून 1955 च्या आसपास चित्ता नामशेष झाला होता. 1951 मध्ये आंध्रप्रदेशातील जंगलात शेवटचा जंगली चित्ता दिसल्याची नोंद आहे. एकेकाळी चित्ता हा अफ़्रिका युरेशिया व भारतीय उपखंडातील मोठ्या भूभागावर पसरला होता, . भारतातील चित्त्याला अशियाई चित्ता म्हणत. त्याचा भारतात एके काळी मोठ्या भूभागावर वावर होता. परंतु आज केवळ अफ़्रिकेच्या गवताळ प्रदेशापुरते चित्त्याचे स्थान मर्यादित राहिले आहे. याला मुख्य कारण चित्याचे नष्ट झालेले वसतिस्थान हे आहे. चित्त्याचे मुख्य वसतिस्थान जे गवताळ प्रदेश आहे. त्यावर शेती व इतर कारणासाठी मानवी अतिक्रमण झाले. तसेच चित्त्याचे वैशिष्ट्य जे अतिवेग आहे तो चित्त्याच्या प्रगतीत खरेतर मारक ठरला.

Chittah In India नामिबीयातून भारतात होत असलेले चित्त्यांचे आगमन ही येथील जैवविवधतेला हरवलेले गतवैभव मिळवून देण्याची संधी असून तिचे सोने करण्यासाठी सरकारने दीर्घकालीन चित्ता संवर्धन नियोजन करणे अनिवार्य आहे. माळरान हाच या जीवांचा खरा अधिवास असल्याने या पार्श्वभूमीवर देशातील महसुली माळरानांचे पुनरुज्जीवन करावे, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय वन्यजीव अभ्यासक केदार गोरे यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news