Chittah Welcom to India ...असे आहे चित्त्यांचे नवे घर! | पुढारी

Chittah Welcom to India ...असे आहे चित्त्यांचे नवे घर!

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chittah Welcom to India द. आफ्रिकेच्या नामिबियातील आठ चित्ते आज भारतात आणून त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. एका खंडातून थेट दुस-या खंडात आल्यानंतर आफ्रिकेतील चित्त्यांना आशियाच्या भारतीय खंडातील हे नवे घर रुचेल का? हा आता मोठा प्रश्न आहे. भारतीय चित्त्यांना आशियायी चित्त्यांच्या नावे ओळखले जात असे. मात्र 70 वर्षांपूर्वी जवळपास संपूर्ण भारतीय उपखंडातून चित्ते नामशेष झाले. त्यानंतर चित्त्यांचे भारतात पुनरुज्जीवन करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातील आठ चित्ते भारत सरकारने मागवले… पण आता पुढे काय? चित्ते येथील वातावरणात रुळतील का? हा महत्वाचा प्रश्न आहे.

Chittah in India : चित्ते आले पण…

Chittah Welcom to India आफ्रिकेतील वातावरण आणि भारतातील वातावरण यात मोठा फरक आहे. तसेच नामिबियाहून विशेष बोईंग 747-400 विमानानं ग्वालेर, मध्य प्रदेश येथे हे चित्ते आणण्यात आले. नंतर ग्वाल्हेरहून चित्त्यांना हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले. चित्त्यांसाठी हा प्रवास सोपा नव्हता सलग 20 तासांचा प्रवास 8,000 किलोमीटरचे अंतर कापून हे चित्ते भारतात पोहोचले आहेत. त्यामुळे या सर्वाचा चित्त्यांवर निश्चितच मोठा परिणाम झाला असेल.

भारत सरकारने चित्त्यांना येथे आणण्यापूर्वी जवळपास मोठा अभ्यास करून त्यांच्यासाठी खास वातावरण तयार केले. चित्त्यांना येथे रुळण्यासाठी आफ्रिकेप्रमाणे चांगले वातावरण मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचं (CCF) एक पथक चित्त्यांसोबत आहे. सुरुवातीला चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Chittah Welcom to India असे आहे चित्त्यांंचे नवे घर

कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. पिण्यासाठी मुबलक पाण्याची सोय आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येईल. त्यांना एक महिना येथे क्वारंटाईन ठेवण्यात येईल. एक महिना त्यांचे निरीक्षण करण्यात येईल.

Chittah Welcom to India चित्त्यांसमोरील आव्हानं

भारतात आणलेल्या चित्त्यांसमोर काही आव्हानं असतील. चित्त्यांना भारतातील वातावरणाशी जुळवून घ्यावं लागेल. चित्त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यांना 12 किलोमीटरच्या विशेष अधिवासात विलगीकरणात म्हणजेच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल. भारतात आढळणारं हरीण आफ्रिकेत आढळतं नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणं चित्त्यांना जमेल का, हा प्रश्न आहे. निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येईल.

हे ही वाचा…

Chittah In India : कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्याच्या वेगाचा थरार… पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुनर्स्थापन

Chittah In India प्रतीक्षा संपली…अखेर नामिबियातील चित्त्यांचे भारतात आगमन! मोदी यांच्या हस्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येईल….

Back to top button